in

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झेडपी अध्यक्षाच उपोषण

वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील कोरा तर कारंजा तालुक्यातील नारा येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत तयार करण्यात आली आहे. पण पदभरती न झाल्यान हे केंद्र अद्यापही सुरू झालेले नाही. या प्राथमिक आरोग्य केंद्रांतील पद भरतीच्या मागणीसाठी जिल्हा परिषदच्या अध्यक्ष सरिता गाखरे यांनी लाक्षणिक उपोषण सुरू केलं आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयापुढं जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सरिता गाखरे यांनी लाक्षणिक उपोषण केल. उपाध्यक्ष वैशाली येरावार, सभापती सरस्वती मडावी यांचा उपोषणात सहभाग होता. आकृतिबंधानुसार पद भरतीला शासन स्तरावरून मंजूरी मिळण्याची मागणी करण्यात आली. या ठिकाणी दोन वर्षांपासून इमारत तयार करण्यात आली आहे. पण पदवभरती झाली नसल्याने दोन्ही आरोग्य केंद्र अद्याप सुरू झालेले नाही. अध्यक्षांकडून पदभरतीकरिता दीड वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. या मागणीसाठी लाक्षणिक उपोषण सुरू केलं आहे. लाक्षणिक उपोषण सुरू केल्यानंतर खासदार रामदास तडस यांची भेट दिली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

व्हायरल व्हिडीओ मारहाण प्रकरण; गजानन बुवा चिकणकर यांच्यावर गुन्हा दाखल

‘ब्लू टीक’ पेक्षा लोकांच्या लसीकरणाकडे जास्त लक्ष द्या