in

काल मुंबईत ‘शुन्य’ कोरोना मृत्यू नोंद

रविवारी नागरिकांना दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे. कोरोनामुळे मुंबईत रविवारी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. २६ मार्च २०२० ला मुंबईत एकही कोरोना रुग्ण दगावला नव्हता. मात्र नवीन ३६७ रुग्णांची नोंद झाली असून मुंबईतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ७ लाख ५० हजार ८०८ पर्यंत पोहोचली आहे. देशासह राज्यातीलही कोरोनाचा प्रादुर्भाव मंदावताना पाहायला मिळत आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची आकडेवारी यामागील प्रमुख कारण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

पहिल्या लाटेत कोरोना रुग्ण आणि रुग्णसंख्या आटोक्यात आली तर दुसऱया लाटेतही राज्य सरकार व पालिकेच्या धारावी आणि नंतर अत्यंत शिस्तबद्धरीत्या राबवलेल्या मुंबई मॉडेलमुळे कोरोना रुग्ण आणि त्यांची मृत्यूसंख्या अधिक वेगाने रोखणे शक्य झाले आहे. गेल्या १८ महिन्यात मुंबईत कोरोनामुळे एकूण १६,१८० जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईमध्ये आतापर्यंत १ कोटी ९ लाख ५७ हजार ३९२ चाचण्या करण्यात आल्या आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कुत्र्याची बिबट्याने केली शिकार, चित्तथरारक घटना सीसीटिव्ही कैद

केवळ 2 मिनटं 33 सेकंदामध्ये जिल्हा रुग्णालयातून दुचाकी लंपास