in

नौदल सैनिकाचे अपहरण करून जाळले…

लोकशाही न्यूज नेटवर्क

सुरजकुमार मिथिलेश दुबे  (वय २७) या नौदलातील सैनिक पदावर कार्यरत असलेल्या तरुणाचे तीन अज्ञातांनी चेन्नई विमानतळावरून अपहरण केले. यानंतर १० लाख रुपयांची मागणी करण्यात आली. मात्र पैसे देण्यास नकार दिल्याने ५ फेब्रुवारी रोजी तलासरी तालुक्यातील वेवजी गावानजीकच्या जंगलात अपहरणकर्त्यांनी पेट्रोल टाकून या सैनिकाला जीवंत जाळले. मुंबईतील रुग्णालयात दाखल केलेल्या सुरजकुमार मिथिलेश दुबे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

सुरजकुमार मिथिलेश दुबे (वय २७) झारखंड राज्यातील रहिवासी होता. भारतीय नौदलात २००१ साली सिबिंग सीमॅन पदी तो रुजू झाला होता. ३१ जानेवारी रोजी सुरजकुमार दुबे चेन्नई विमानतळावर पोहोचल्यावर तीन अज्ञात व्यक्तींनी त्याचे अपहरण केले. यानंतर त्याला तीन दिवस चेन्नईमधील अज्ञात स्थळी कोंडून ठेवण्यात आले होते. तसेच त्याच्याकडे १० लाख रुपयांची मागणी करण्यात आली. मात्र त्याने अपहरणकर्त्यांना पैसे देण्यास नकार दिला. ५ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र- गुजरात सीमेलगत, पालघर जिल्ह्यातील तलासरी येथे वेवजी गावानजीक त्याला आणण्यात आले.
जंगलात रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत या तिघांना सुरजकुमारच्या शरीरावर पेट्रोल टाकून त्याला पेटवले.

वेवजी गावच्या जंगलात विवस्त्र अवस्थेत तसेच आगीत होरपळलेल्या परिस्थितीत एका व्यक्तीला स्थानिकांनी पाहिले. स्थानिकांनी वेवजी पोलीस चौकीत या प्रकाराची माहिती दिली.पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत आगीत होरपळलेल्या सुरजकुमार मिथिलेश दुबे याला डहाणूच्या आगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. चौकशी दरम्यान दिलेल्या जबाबात पोलिसांना दुबे याने घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्याला मुंबईत येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान शनिवारी दुपारच्या सुमारास सुरजकुमार मिथिलेश दुबे या नौदल सैनिकाचा मृत्यू झाला.

अपहरण करून हत्या केल्याप्रकरणी घोलवड पोलीस ठाण्यात तीन अज्ञातांविरोधात कलम ३०७, ३६४, ३९२ आणि ३४ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.  गुन्ह्याचा अधिक तपास या ठाण्याचे प्रभारी अधिकारी कुंभार करत आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Corona Vaccination : 56 लाखांहून अधिक नागरिकांना दिली कोरोनाप्रतिबंधक लस

मोहटा देवी मंदिरात परंपरेच्या नावाखाली अंधश्रद्धेचा प्रकार… चौकशीचे न्यायालयाचे आदेश