in

भंडाऱ्यात मद्यपानाच्या वादातून तरुणाचा खून; मृतदेह जाळण्याचा प्रयत्न

पार्टीत मद्य घेतल्यानंतर झालेल्या वादात लोखंडी रॉड व चाकूने भोसकून तरुणाचा खून करुन जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्याची घटना घडली. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील बघेडा येथे ही घटना उघडकीस आली आहे.

या प्रकरणी एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अभिमन्यू अरविंद माने वय 22 वर्ष रा., तुमसर असे मृताचे नाव आहे. सोमवारी रात्री बघेडा येथे मित्राकडे पार्टीसाठी गेला होता. तेथे दारू प्यायल्यानंतर वाद झाला.

या वादात लोखंडी रॉड व चाकूने भोसकून खून केला. त्यानंतर मृतदेह गावाजवळील नाल्यात फेकला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला असून गोबरवाही पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अमरावतीत २६१ किलो गांजा जप्त, एकजण ताब्यात

“100 गुन्हे दाखल करा, हम जितेंगे.. और भी लढेंगे”