in

‘या’ तारखेच्या आत जिल्ह्यात आला, तरच तुम्ही गणेशोत्सव साजरा करणार

You will celebrate Ganeshotsav only if you come to the district within this date
You will celebrate Ganeshotsav only if you come to the district within this date
Share

राज्यात सगळीकडे कोरोनाने थैमान घातल्याने पुन्हा एकदा अनेक गावाने स्वत:हून क्वारंटाईन करून घेतलं आहे. गावाच्या, काही तालुक्याच्या तर काही ठिकाणी संपुर्ण जिल्ह्यामध्येच बाहेरून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध आणले आहेत. अशातच सिंधुदुर्ग जिल्हात अजब फतवा काढण्यात आला आहे.

मुंबई तसेच इतर ठिकाणी काम करणारे अनेक चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात परतत असतात. दरवर्षी कोकणवाशी मोठ्या उत्साहात हा सण साजरा करतात, मात्र यंदा तशाप्रकारचं कोणतच चित्र आपल्याला पाहायला मिळणार नाही. कारण गावाकडे कोरोनाने थैमान माजवले असताना आता सर्व ठिकाणी कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठीही एक नवा नियम लागू करण्यात आला आहे, तो म्हणजे जर तुम्ही गणपतीच्या सणासाठी गावाकडे येणार असाल, तर 7 ऑगस्टच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंतच तुम्ही जिल्ह्यात प्रवेश करू शकता, नाहीतर त्यानंतर तुम्हाला गणपती सणासाठी येण्यास परवागणी नाही, असा निर्णय सिंधुदुर्गमधील जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

ऑगस्ट महिन्याच्या 22 तारखेला गणेश चतुर्थी आहे, त्यानिमित्त शहरातील अनेक चाकरमानी आपल्या गावाकडे जात असतात. मात्र 7 ऑगस्टच्या रात्री 12 वाजेपर्यंत जे नागरिक येतील त्यांनाच गणेशोत्सवाच्या सणासाठी परवाणगी दिली जाईल, सोबतच जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येकाकडे ई-पास असणेर बंधनकारक असणार आहे. अशा अटी घोषित करण्यात आल्या आहेत.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Shocking! India is number one in terms of eunuchs, because you will be surprised to hear!

धक्कादायक! नपुसकांच्या बाबतीच भारत पहिल्या नंबरवर, कारण ऐकून व्हाल थक्क!

Maharashtra Corona Update | 6 thousand 875 new patients in last 24 hours, while ...

Maharashtra Corona Update | गेल्या 24 तासात 6 हजार 875 नवे रुग्ण, तर…