in

…असं फोटोशूट तुम्ही उभ्या आयुष्यात पाहिलं नसेल

Share

आजकाल फोटोशूटच क्रेझ इतकं वाढलं कि कोण कस फोटोशूट करेल यांचा अंदाज बांधता येत नाही. या वृत्तात सुद्धा असच झालय, एका गर्भवती महिलेच्या पोटावर मधमाशा बसल्या आहेत,आणि तिने फोटोशूट केले आहे. या फोटोशूटची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. तसेच तिने असा धोका पत्करून का फोटोशूट केलय असा प्रश्न सर्वानाच पडलाय.

सध्या प्री वेडिंग, मॅटर्निटी फोटोशूटच जास्त क्रेझ आहे. त्यामुळे या फोटोशूटमध्ये भयानक ट्रिक्स वापरल्या जातात ज्याची तुम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही.त्यात तुम्ही बरेच मॅटर्निटी फोटोशूट पाहिले असतील. मात्र एका गर्भवती महिलेने आपल्या पोटावर मधमाशा ठेवून फोटोशूट केलं तुम्ही पाहीले आहे का ? नाहीना.चला तर मग जाणून घेऊयात. टेक्सासमधील एका महिलेनं हे फोटोशूट केलं आहे. बेथानी कारूलक-बेकर असं या महिलेचं नाव आहे. जवळपास 10 हजार मधमाश्या तिच्या पोटावर बसल्या आहेत आणि तिने पोझ देत आपले फोटो काढलेत.महिलेचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले.

Cheers, babe.

Posted by Bethany Karulak-Baker on Thursday, 2 July 2020

दरम्यान या फोटोशूटवर अनेकांनी बाळाला धोका पोहोचेल्याची व डॉक्टरांचा सल्ला घेतला कि नाही असं प्रश्न विचारले आहेत. तरीही या महिलेनं आपल्या फेसबुकवर भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. ज्यामध्ये बेथानी म्हणाली, “गेल्या एका वर्षात मी गर्भपाताच्या वेदना सहन केल्यात. त्यामुळे मी डिप्रेशनमध्ये गेले होते. काही महिन्यांनी मी पुन्हा गर्भवती राहिले. माझं बाळ मी पुन्हा गमावेत की काय अशी भीती मला वाटू लागली. ही भीती घालवण्यासाठी मी असं फोटोशूट केलं आहे. हे मॅटर्निटी फोटोशूट मला आणि माझ्या होणाऱ्या बाळाला भविष्यात माझ्या गर्भात असलेल्या योद्धाची आठवण करून देईल”

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

नाशिकमध्ये जुना वाडा कोसळल्याची घटना

Metro Job Vacancy 2020: दर महिना पगार 1 लाखावर…आताच अर्ज करा