in ,

“२०० शेतकऱ्यांना तुम्ही अटक करता, मात्र दीप सिद्धूला अटक करत नाही” – संजय राऊत

लोकशाही न्यूज नेटवर्क

देशात सध्या शेतकरी आंदोलनावरुन वातावरण तापलेलं आहे. संसदेत राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही सभागृहांमध्ये चर्चा सुरु आहे. विरोधक केंद्र सरकारवर शेतकरी आंदोलनवरुन हल्लाबोल करत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील केंद्रावर निशाणा साधला आहे.


संजय राऊत यांनी शेतकऱ्यांवर करण्यात आलेल्या अटकेच्या कारवाईवरुन संताप व्यक्त केला आहे. ज्याप्रकारे शेतकरी आंदोलनाची बदनामी केली जात आहे ते देशासाठी योग्य नाही असंही ते म्हणाले. राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याने मोदींप्रमाणे संपूर्ण देश दु:खी असल्याचं सांगताना दिप सिद्धूला अद्याप अटक का करण्यात आलेली नाही. सरकार तिरंग्याचा अपमान करण्यामागे असणाऱ्या खऱ्या आरोपींना अटक करत नाही. दिप सिद्धू कुठे आहे? त्याला अटक केला जात नाही. पण सरकारने २०० शेतकऱ्यांना अटक केली आहे”. अशी विचारणा संजय राऊत यांनी केली.


यासोबतच संजय राऊत म्हणाले की, अर्णब गोस्वामी देशप्रेमी आहेत, ज्यांच्यामुळे एका निरपराध व्यक्तीने महाराष्ट्रात आत्महत्या केली, कंगना रनौत हीसुध्दा देशप्रेमी आहे. शेतकरी आंदोलनावरुन संजय राऊत राज्यसभेत आक्रमक, शेतकऱ्यांवर आयपीसीचे कलम हटवून देशद्रोहाचे गुन्हे, शेतकऱ्यांना बदनाम केलं जातं, बहुमत हे अहंकाराने चालत नाही, संजय राऊतांनी सरकारला खडसावलं आहे.जो सरकारला प्रश्न विचारतो, त्याला देशद्रोही ठरवलं जातं’ अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप सरकारवर केलीय

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

साष्ट पिंपळगावमधील मराठा आंदोलनाचा 17 वा दिवस

“श्रीमंताच्या घरातील कावळा देखील मोर दिसतो आणि…; नवज्योत सिंग सिद्धू यांचं शेतकरी आंदोलनावरुन अनोख्या शैलीत ट्विट