अमरावती जिल्हात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्ह्यात आठवड्याभारासाठी कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी ही घोषणा केली आहे. या लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी मुभा देण्यात आली आहे. अनलॉक नंतर राज्यात लागणारा हा पहिला लॉकडाऊन आहे.
अमरावती जिल्हात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने अमरावती जिल्ह्यात आज रविवारी कडकडीत लॉकडाऊन आहे. त्यामुळे आज अमरावती शहरात लॉकडाऊनच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर अमरावती शहराच्या पंचवटी, राजकमल या भागात भेटी दिली.
अमरावतीची अमरावतीत 2,783 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आहेत. कोरोनाची परिस्थिती पाहाता अमरावती महानगरपालिकाने अमरावती शहरात 12 कंटेन्मेंट झोन घोषीत केले आहेत. या प्रतिबंधित क्षेत्रातील रहिवाशांना 14 दिवसापर्यंत घराच्या बाहेर निघता येणार नसून हे प्रतिबंधित क्षेत्र आहे, असे आदेश प्रशासनाने दिला आहे. तर, या ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. या 12 प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये सर्वात जास्त रुग्ण आढळल्याने हा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला.
Comments
Loading…