आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंग प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप आणि दावे-प्रतिदावे होत आहेत. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांना भाजपाकडून ऑफर आली होती, असा दावा करणारे ट्विट राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज सकाळी केले होते. त्याला खुद्द राजेंद्र यड्रावकर यांनी दुजोरा दिला आहे.
शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र यड्रावकर यांनी महाविकास आघाडीमध्ये न जाता भाजपाबरोबर राहावं, यासाठी रश्मी शुक्ला यांनी त्यांची वैयक्तिक भेट घेतली, त्यांना फोन केले व त्यांच्यावर दबाव आणण्याचा देखील प्रयत्न केला होता. अजून पुरावे काय पाहिजेत?’ असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. त्याला यड्रावकर यांनी दुजोरा दिला आहे. अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर रश्मी शुक्ला यांनी आपल्याशी संपर्क साधून भाजपामध्ये येण्याबाबत विचारणा केली होती. मात्र कार्यकर्ते आणि नागरिकांशी चर्चा केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर याची कल्पना आपण राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली होती, असे यड्रावकर यांनी सांगितले.
Comments
Loading…