in

शाओमीचा 5G स्मार्टफोन लवरच होणार भारतात लाँच

जूनमध्ये Xiaomi Mi 11 Lite 4G स्मार्टफोन भारतात सादर करण्यात आला होता. कंपनीने हा फोन भारतातील सर्वात स्लिम (पातळ) स्मार्टफोन म्हणून मार्केट केला होता. या फोनच्या लाँच इव्हेंटच्या शेवटी कंपनीने 5G व्हेरिएंटचे संकेत दिले होते. आता 91 मोबाईल्सने माहिती दिली आहे कि शाओमीच्या या स्मार्टफोनचा 5G व्हेरिएंट म्हणजे Xiaomi 11 Lite 5G NE (New Edition) या महिन्यात भारतात लाँच केला जाऊ शकतो.

पब्लिकेशनने अचूक तारीख सांगितली नाही. परंतु येत्या काही दिवसांत या स्मार्टफोनच्या लाँच डेटची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. काही दिवसांपूर्वी Xiaomi 11 Lite 5G NE स्मार्टफोन IMEI डेटाबेसमध्ये दिसला होता, त्यामुळे या लाँचची शक्यता अजून वाढली आहे. हा फोन याआधी जागतिक बाजारात सादर झाला आहे. या स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 778G चिपसेट दिला जाऊ शकतो.

Xiaomi 11 Lite 5G NE स्पेसिफिकेशन्स

Xiaomi 11 Lite 5G NE जागतिक बाजारात लाँच झाला आहे, त्यामुळे या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.55-इंचाचा फुल एचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. हा फोन 240Hz टच सॅम्पलिंग रेटसह सादर करण्यात आला आहे. हा फोन Android 11 आधारित MIUI 12 वर चालतो.

Xiaomi 11 Lite 5G NE स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 778G चिपसेटसह सादर केला जाऊ शकतो. यात 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये कंपनीने 5G/4G, dual-band Wi-Fi, Bluetooth, GPS सह USB Type-C पोर्ट असे पर्याय दिले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Land scam Case| छगन भुजबळांचा मुलगा आणि पुतण्याला न्यायालयाचा मोठा दिलासा

अनिल देशमुखांची ईडीविरोधात हायकोर्टात याचिका दाखल