in

WTC Final | जागतिक कसोटी अजिंक्यपद फायनलसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर

१४वी इंडियन प्रीमिअर लीग ( IPL 2021) आता अनिश्चित काळासाठी स्थगित केल्यानंतर भारतीय खेळाडूंचा संपूर्ण फोकस आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर केंद्रीत केला आहे. भारतीय संघ पुढील महिन्यापासून इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे आणि कोरोनाचे नियम व १४ दिवसांचा क्वारंटाईन लक्षात घेता जूनच्या पहिल्याच आठवड्यात भारतीय खेळाडू इंग्लंडसाठी रवाना होतील. भारतीय संघ १८ ते २३ जून या कालावधीत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये न्यूझीलंडचा सामना करेल, त्यानंतर इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका. चार महिन्यांच्या या दौऱ्यासाठी बीसीसीआयनं आज टीम इंडियाची घोषणा केली.

कोरोना परिस्थितीत इंग्लंडमध्ये सराव सामन्यांचे आयोजन होणं, अवघड आहे. त्यामुळे जम्बो संघ पाठवून त्यातून दोन संघ तयार करून टीम इंडियाला सराव सामनेही खेळता येतील.

भारतीय संघ – विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुबमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्वि, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, उमेश यादव, लोकेश राहुल व वृद्धीमान सहा यांची निवड फिटनेस टेस्टनंतर

राखीव खेळाडू – अभिमन्य इस्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्झान नागवास्वाला.

टीम इंडियाचा इंग्लंड दौरा
१८ ते २३ जून – भारत विरुद्ध न्यूझीलंड ( जागतिक कसोटी अजिंक्यपद फायनल)
भारत वि. इंग्लंड कसोटी मालिका
४ ते ८ ऑगस्ट – पहिली कसोटी
१२ ते १६ ऑगस्ट – दुसरी कसोटी
२५ ते २९ ऑगस्ट – तिसरी कसोटी
२ ते ६ सप्टेंबर – चौथी कसोटी
१० ते १४ सप्टेंबर – पाचवी कसोटी

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

लसीकरणासाठी नोंदणी करणाऱ्यांना नवा सिक्युरिटी कोड

शरद पवारांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र; ‘ही’ केली मागणी