in

कुस्तीपटू विनेश फोगाटची ‘सुवर्ण’कमाई

जगभरात आज 8 मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. या दिवशीच देशाची कर्तृत्वान महिला खेळाडू असलेल्या विनेश फोगाटने भारताची मान उंचावर नेत महिलांचे स्थानही सर्वोच्च स्थानी प्रबळ केले आहे.

मॅट्टेओ पेलिकोन कुस्ती स्पर्धेत विनेश फोगाटने कॅनडाच्या डायना मेरीला 4-0 असे पराभूत करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. विनेशने महिलांच्या 53 किलोच्या गटामध्ये सुवर्ण पदक पटकावलं आहे. यासह तिने रॅकिंगमध्येही अव्वल स्थानी झेप घेतली आहे.

रविवारी मॅट्टेओ पेलिकोन कुस्ती स्पर्धेत विनेशचा कॅनडाच्या डायना मेरी हेलन वीकरसोबत अंतिम सामना खेळवण्यात आला. या सामन्यादरम्यान विनेश डायनावर अखेरपर्यंत वरचढ राहिली. विनेशला एकही पॉइँट घेऊ दिला नाही. विनेशने डायनाचा 4-0 अशा एकतर्फी फरकाने विजय मिळवला.

रँकिंगमध्ये अव्वल

विनेशने या विजयासह रँकिंगमध्ये पहिला क्रमांक पटकावला. या स्पर्धेआधी विनेश ही तिसऱ्या क्रमांकावर होती.विनेशने मागील आठवड्यात कीवमध्ये सुवर्णकमाई केली होती.त्यामुळे ही तिची दुसरी सुवर्णकमाई ठरली. तसेच विनेश टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली एकमेव भारतीय महिला कुस्तीपटू आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

”चोराच्या उलट्या बोंबा” ; जयंत पाटील यांचा फडणविसांना टोला

महिला दिना’च्या निमित्ताने करीनाने शेअर केला दुसऱ्या बाळाचा फोटो