राज्यात आज रेकॉर्डब्रेक कोरोना रुग्णसंख्या आढळून आली आहे.तब्बल 9 हजार 855 कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येत हा आकडा सर्वात मोठा आहे. त्यामुळे राज्य सरकारसह आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आपल्या ट्वीटरवरून दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत राज्यात 9 हजार 855 कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. सध्या राज्यात 82, 343 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. मंगळवारी हीच आकडेवारी 7 हजार 863 होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांची आकडेवारी पाहता कोरोना रुग्णवाढीचा आलेख चढाच राहिला आहे. त्यामुळे हि आकडेवारी चिंताजनक आहे.
राज्यात आज नवीन 6 हजार 559 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे आतापर्यत एकूण 20 लाख 43 हजार 349 रुग्ण बरे होऊन कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.77% टक्क्यावर पोहोचले आहे.
Comments
Loading…