in ,

चिंताजनक ! आज कोरोना रुग्णांनी ओलांडला ६ हजाराचा टप्पा

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत चालली आहे. आज नव्या कोरोना रुग्णांनी तब्बल ६ हजाराचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे आता आरोग्य विभागाची चिंता वाढत चालली आहे.

गेल्या २४ तासांध्ये राज्यभरात ६ हजार ११२ नवे कोरोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता २० लाख ८७ हजार ६३२ वर पोहचली आहे. तर आज ४४ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

२ हजार १५९ जण आज कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. आजपर्यंत राज्यात १९ लाख ८९ हजार ९६३ जण कोरोनातून बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बेर होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५. ३२ टक्के एवढे झाले आहे.आज ४४ रुग्णांचा मृत्यू झाल्याने आतापर्यत ५१ हजार ७१३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
दरम्यान वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढत असून अनेक ठिकाणी लॉकडाउन करण्यासंबंधी राज्य सरकार विचार करत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘त्या’ स्पर्शामागे लैंगिक भावनाच, विशेष पॉक्सो न्यायालयाचा निर्वाळा

पाच रुग्ण आढळल्यास इमारत होणार सील, मुंबई महापालिकेचा निर्णय