in ,

देशासाठी चिंताजनक बातमी; कोरोना असाच राहिला तर 2021 मध्ये दररोज होईल…

Worrying news for the country; If Corona stays that way, it will happen every day in 2021
Worrying news for the country; If Corona stays that way, it will happen every day in 2021
Share

गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत चालली आहे. दिवसेंदिवस दहा हजारांच्या पटीत ही वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच अमेरिकेची सर्वात मोठी वैद्यकिय संस्था MIT ने भारतासंदर्भात मोठा अहवाल सादर केला आहे. MIT (Massachusetts Institute of Technology) ही जगाच्या पातळीवर वैद्यकीय क्षेत्रात संशोधन करणारी सर्वात मोठी संस्था माणली जाते. इथल्या शास्त्रज्ञांनी असे सांगितले आहे की जर चाचणी आणि संक्रमणाचा दर सारखाच राहिला तर 2021 च्या अखेरीस भारतात दररोज सुमारे 2.87 लाख कोरोनाचे नवे रुग्ण समोर येत राहतील.

या संशोधनात बरेच काही सांगितले गेले आहे. इतर देशांबद्दलही बर्‍याच गोष्टी बोलल्या गेल्या आहेत. त्यांचेही मूल्यांकन केले गेले आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संशोधनात असेही सांगितले गेले आहे की आपण या समस्येपासून कसे मुक्त होऊ शकतो.

एमआयटीमध्ये स्लोन स्कूल ऑफ मॅनेजमेंट नावाची टीम काम करत आहे. हजीर रहमानदाद, टीवाय लिम आणि जॉन स्टारमन यांनी या सगळ्यावर संशोधन केले. या तिघांच्या टीमने जगातील 84 देशांचा अभ्यास केला. या 84 देशांमध्ये जगातील 60 टक्के लोक राहातात.

या संस्थेने निवडलेल्या देशांमधील कोरोनाच्या आकड्यांवर अभ्यास केला. या आकड्यांच्या माध्यमातून तज्ज्ञांनी संबंधीत शोध सांगितले आहेत.

1 किती लोकांमध्ये असिम्प्टोमॅटिक कोरोनाची लक्षणे असू शकतात?

2 किती लोकांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे?

3 किती लोक कोरोनाचे संक्रमण पसरवू शकतात?

4 कोरोनावर किती लोक यशस्वी मात करू शकतात?

अशा मुद्द्यांच्या आधारे हा अहवाल सादर करण्यात आलेला आहे., त्यामुळे देशात आज ज्या पध्दतीने कोरोना रुग्णांच्या संदर्भातल्या चाचण्या वाढवल्या नाहीत, संबंधित कोरोना रुग्णांना लवकरात लवकर क्वारंटाईन केलं नाही, तर भारतात कोरोनाचे संक्रमण मोठ्याप्रमाणात होईल, असा अंदाज एमआयटी संस्थेने सादर केला आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Not in Maharashtra, but the voice of Ganapati Bappa Morya roamed 'Ya'

महाराष्ट्रात नाही, पण ‘या’ ठिकाणी घुमला गणपत्ती बाप्पा मोरयाचा आवाज

भर लॉकडाऊनमध्येही सुरू आहे सनी लिओनीची स्विमींग धमाल; पाहा VIDEO