in ,

चिंताजनक ! राज्यात सोमवारच्या तुलनेत आणखी हजार रुग्णांची वाढ

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. आज जवळपास ६२१८ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे सोमवारच्या तुलनेत आज दिवसभरात आणखी हजार रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर पडली आहे.

आज दिवसभरात राज्यात ६ हजार २१८ नवे करोनाबाधित वाढले असून, ५१ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.४५ टक्के एवढा आहे. आजपर्यंत राज्यात ५१ हजार ८५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूणच ही आकडेवारी सर्वसामान्यांसह सरकार व प्रशासनासाठी देखील चिंताजनक आहे.

दरम्यान, आज राज्यात ५ हजार ८६९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण २० लाख ५ हजार ८५१ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९४.९६ टक्के एवढे झाले आहे.राज्यातील अॅक्टिव्ह रुग्ण संख्या ५३ हजार ४०९ आहे.

वाढत्या रुग्णसंख्येनंतर काही जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा लॉकडाउन लागणार का? असा प्रश्न सर्वसामान्यांना सतावू लागला आहे. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार दाखल झाले असून, राज्यातील कोरोना परिस्थितीवर बैठक सुरू आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पोहरादेवी गडावरील गर्दीवर प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी- मुख्यमंत्री

देशात 1 कोटी 17 लाखांहून अधिक लोकांचे लसीकरण पूर्ण