ओमकार वाबळे, लोकशाही न्यूज
ईश्वरी ही एक तृतीयपंथीय असून मागील चौदा वर्षांपासून विरारच्या रेल्वे स्थानकावर पैसे मागून पोटाची खळगी भरत आहे. दरम्यान, काही वर्षांपूर्वी ईश्वरीने नवऱ्याने सोडलेल्या गर्भवती महिलेचं मूल दत्तक घेतलं. सध्या त्याच्या संगोपनापासून ते शिक्षणापर्यंत सर्व जबाबदारी ती पार पाडत आहे. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने लोकशाही न्यूजचा खास रिपोर्ट…
गर्भवतीचं मूल घेतलं दत्तक
काही वर्षांपूर्वी ईश्वरीने नवऱ्याने सोडलेल्या गर्भवती महिलेला मदतीचा हात दिला. या गर्भवतीचा सर्व खर्च स्वत: उचलत तिचं बाळ ईश्वरीने दत्तक घेतलं. मागील पाच वर्षांपासून या मुलाच्या शिक्षणाचा खर्च आणि संगोपनाची संपूर्ण जबाबदारी तिने उचलली.
कुटुंबीयांनी नाकारल्याने धरली मुंबईची वाट…
समाजात बदनामी होण्याच्या भीतीने घरच्यांनी हाकलल्याने ईश्वरीने मुंबईची वाट धरली. २००७ साली मुंबईत पाऊल ठेऊन विरारमध्ये जीवदानी माता मंदिराच्या पायथ्याशी एका कुटुंबाने तिला थारा दिला. यानंतर याच परिसरात राहून विरार स्टेशनवर पैसे मागण्यास तिने सुरुवात केली.
लॉकडाऊनच्या आधी अनाथांना केलं सहाय्य
कोरोना महामारी सुरू होण्यापूर्वी ईश्वरीने अनाथ मुलांना जीवनावश्यक वस्तू देण्यास सुरुवात केली होती. यावेळी अनाथाश्रमातील मुलांना तिने आर्थिक मदतही पुरवली. मात्र कोरोनामुळे सर्व बंद झाल्याने तिने गावचा रस्ता धरला.
Comments
Loading…