in

महिला दिन : तीन लाखांहून अधिक अर्भकांना सुरक्षित जग मिळवून देणारी – डॉ मिनी बोधनवाला

एका वर्षाला साधारण ३ लाख चेहऱ्यांना हास्य देणारी ती. आपल्या घरात बाळ जन्माला येणार, ही कल्पनाच सर्वाना सुखावून टाकते. पण या बाळ आणि बाळंतीणीला घरापर्यंत सुखरूप पोहचवण्याचे काम ती करते. वाडिया रुग्णालयात व्यवस्थापकीय पदावर काम करूनही सर्व टीमला सोबत घेऊन काम करण्याची तिची कला.

एक दंतचिकित्सक ते मुंबईतील एक मोठ्या रुग्णालयाची मुख्य कार्यकारी अधिकारी हा तिचा प्रवास थक्क करणारा आहे. ती फक्त एक डॉक्टर नाही, एमबीए करून तिने फायनान्स या क्षेत्रामध्ये सुद्धा पदवी मिळवलेली आहे. २०१४ साली एकदा काही माणसे तिच्या रुग्णालयमध्ये जन्मजात चिटकलेल्या दोन मुली घेऊन आले. पैसे किंवा तिचे पालक कुठे आहेत, या सर्व गोष्टी विचारात बसण्यापेक्षा आपण या लहान बाळावरती उपचार करायला हवे, असे या मातृहृदयी डॉक्टरला वाटले. म्हणून त्या मुलींवरती उपचार सुरू झाले.

युएसएमधील डॉक्टरांच्या सल्ल्याने या मुलींना पुन्हा नवे आयुष्य मिळाले. हॉस्पिटल मधील डॉक्टरांना आवश्यकत्या सुविधा देण्यापासून संपूर्ण रुग्णालयाचे व्यवस्थापन ती अगदी चोखपणे बजावते. रुग्णांना कमी पैशांमध्ये जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीच्या सेवा कशा देता येतील, या गोष्टीवर तिचा जास्त जोर असतो. ती जरी शहरामध्ये राहत असली तरी, तिचे लक्ष खेडोपाडी असणाऱ्या लहान मुलांकडे असते. डॉक्टरांची एक टीम खेडोपाडी पाठवून त्या लहान मुलांना चांगली आरोग्यसेवा देण्यासाठी ती नेहमी तत्पर असते. जादूच्या छडीप्रमाणे काम करणारी तीन लाखांहून अधिक अर्भकांना सुरक्षित जग मिळवून देणारी ती म्हणजे डॉ. मिनी बोधनवाला. डॉ. बोधनवाला यांना महिलादिनी लोकशाहीचा सलाम.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Gold Silver Rates : सोने-चांदी दरात घसरण

पुरुषांचे वर्चस्व असलेल्या क्रीडा क्षेत्रात स्वतःचे अढळस्थान निर्माण करणारी कबड्डीपंच – आरती बारी