in

Women Tractor driver Jyoti Deshmukh;महिलांमध्ये नवीन उमेदीच्या बीज रोवणाऱ्या ‘ज्योती’

Share

अमोल नांदुरकर : शेती म्हटलं तर फारच कष्टाचे काम, ते एकट्या दुकट्याने करण तर अवघडच म्हणा…मात्र या घटनेत घरी पती, सासरां, दीर अशा कर्त्या पुरुषांनी आत्महत्या केली असताना, या दुखातून खचून न जाता ज्योती देशमुख यांनी एकट्यानेच संसाराचा गाडा हाकण्यास सुरुवात केली. स्वत;चं ट्रॅक्टर चालवून त्यांनी शेतात राबून मातीच सोन केल आहे. चला तर जाणून घेऊयात त्यांच्या संघर्षाची कहाणी…

शेतीतील कर्जबाजारीपणामुळे सहा वर्षात पती, दीर आणि सासऱ्याने आत्महत्या केली. सारं आयुष्यच उध्वस्त झालेल्या ज्योती ताई हरल्या नाहीत, पती असताना कधी घराचा उंबरठा न ओलांडणाऱ्या ज्योती यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. मात्र, शेतीतील कोणतंच ज्ञान नसल्यानं आपल्याला हे खरंच झेपणार का ? असा प्रश्न त्यांना पडायचा. ज्योतीताईंचा शेती करण्याचा निर्णय अनेक आव्हानांनी भरलेला होता. मात्र, ध्येय निश्चित केलेल्या ज्योतीताईंनी हा खाचखळग्यांचा प्रवास जिद्दीने सुरु ठेवला.

बैलगाडी हाकण्यापासून, ट्रॅक्टर चालवण्यापर्यंत शेतातील प्रत्येक काम ज्योती देशमुख यांनी करायला सुरुवात केली. शिकायची जिद्द असलेल्या ज्योती यांनी हळूहळू शेतीतील बारकावे आणि यशाचे अनेक मूलमंत्र आत्मसात केले. कापूस, सोयाबीन, तूर या पारंपरिक पिकांच्या साथीने आपली शेती सुरु केली. शेतात बोअर केल्यानंतर खारपाणपट्टा असलेल्या त्यांच्या शेतात गोडे पाणी लागले, वीजही आली. त्यामुळे जिद्दीने ज्योतीताईंनी बागायती शेती सुरु केली. काही दिवसांतचं त्यांच्या प्रयत्नांना यश आलं.आज ज्योती यांनी मुलगा हेमंतला संगणक अभियंता बनविलं. तसंच दिराच्या मुलीला अकोल्यात तिच्या आईसह शिक्षणासाठी ठेवलं. शेतीच्या भरवशावरच त्यांनी नवं घर देखील बांधलं.

शेतीतील योगदानाबद्दल अकोल्याच्या डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने यश्यस्वी शेतकरी म्हणून गौरव केला. याशिवाय जिल्हा पोलीस दलाने त्यांचा ‘जननी सप्ताहा’त विशेष सत्कार केला. एक महिला असून जिद्दीने पेटून उठणाऱ्या ज्योतीताईला पाहून गावातील महिलांमध्येही नवीन उर्जेची ज्योती निर्माण झालीय.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

विधानभवनात कोरोना

दाक्षिणात्य अभिनेते जयप्रकाश रेड्डी यांचे निधन