मध्यप्रदेशच्या गुनामध्ये एका महिलेला अमानुष वागणूक दिल्याचे समोर आले आहे. यासंबंधी व्हिडीओ मागील दोन दिवसांपासून व्हायरल होतोय. एका पुरुषाशी संबंध ठेवल्याने या महिलेला तिच्या सासरच्या लोकांनी गावभर फिरवले. तिची धिंड काढण्यात आली. तसेच सासरच्या एका व्यक्तीला या महिलेच्या खांद्यावर बसवण्यात आले. काठ्यांनी मारत महिलेला गावभर फिरवण्यात आले. संबंधित महिला पाच महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती समोर आली आहे.
ही घटना ९ फेब्रुवारीची आहे. मात्र १५ तारखेला याचा व्हिडीओ समोर आला. या प्रकरणाकडे पोलिसांनी दुर्लक्ष करत सासरा, मेव्हणा आणि अन्य सासरच्या मंडळींवर मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या महिलेच्या पतीने तिला सांगई गावात सोडले. यानंतर तो इंदौरला निघून गेला.
यावेळी महिला अन्य पुरुषासोबत राहात असल्याचा आरोप सासरच्या मंडळींनी केला. ते सर्व तिला घेण्यासाठी आले. यानंतर महिलेने येण्यास नकार दिला. मात्र सासरच्या लोकांनी जबरदस्ती केली. तसेच तिला मारहाण करण्यात आली. यानंतर सासरच्या एका मुलाला खांद्यावर बसवून त्यांनी महिलेची धिंड काढली.
Comments
Loading…