in

सर्व प्रवाशांसाठी लोकल सुरु होणार ? राज्यसरकारचे रेल्वेला पत्र

Share

सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास सुरु व्हावा यासाठी राज्यसरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे. राज्यसरकाने लोकल प्रवास सर्वांसाठी खुला व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाला पत्र लिहले आहे.

काेराेनाचे संक्रमण राेखण्यासाठी गेल्या सात महिन्यांपासुन बंद असलेली मुंबईकरांंची लाईफलाईन लाेकल पुन्हा सुरु करण्यासाठी राज्य सरकारने महत्वाचे पाऊल टाकले आहे. सर्वसामान्य मुंबईकरांना लाेकलमधुन प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी, अशा प्रस्तावाचे पत्र राज्य सरकारने रेल्वे प्रशासनाला पाठविले आहे. परंतु सर्वच नागरिकांना लाेकलची दारे खुली करताना वेळेचे बंधन घालण्यात आले आहे.राज्य सरकारच्या प्रस्तावानुसार पहाटे पहिली लोकल ते सकाळी ७.३० सकाळी ११ ते दुपारी ४.३० आणि रात्री ८ वाजल्यापासुन शेवटच्या लाेकल पर्यत सामान्य नागरिकांना प्रवास करता येणार आहे. तर महिला प्रवाशांसाठी दर तासाला एक महिला स्पेशल ट्रेन चालविण्यात यावी असे राज्य सरकारने आपल्या पत्रात नमुद केले आहे. या प्रस्तावाला रेल्वे बाेर्डाची परवानगी मिळाल्यानंतर मुंबईकरांना लाेकलचा प्रवास करता येणार आहे.

मिशिन बिगीन अंतर्गत अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांना लाेकल प्रवासाची मुभा देण्यात आली हाेती. त्यानंतर सर्व महिला,वकिल,गार्ड,दिव्यांग यांना लाेकलमधून प्रवासाची परवानगी देण्यात आली. त्यामुळे सर्वसामान्यांना लाेकल प्रवासाची मुभी कधी देणार असा सवाल उपस्थित केला जात हाेता. काही दिवसांपुर्वी राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनामध्ये बैठक झाली हाेती. त्या बैठकीमध्ये सर्वसामान्य मुंबईकरांना लाेेकलचा प्रवास सुरु करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली हाेती. त्यानुसार आता राज्याचे आपत्ता व्यवस्थापन,मदत आणि पुर्नवसन सचिव किशाेर राजे निंबाळकर यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वेला प्रस्ताव पाठवुन ठराविक वेळेनुसार सर्वसामान्य मुंबईकरांना लाेकल प्रवेश देण्याची मागणी केली आहे. तसेच गर्दीच्या वेळी अधिल लाेकल साेडण्यात याव्यात, महिला प्रवाशांसाठी दर तासाला एक लाेकल चालविण्यात यावी असे नमुद करण्यात आले आहे. तसेच काेराेनासंबंधित नियमाचे पालन करुन लाेकल सेवा पुन्हा सुरु करण्यात यावी असे म्हटले आहे.

काेण काेणत्या वेळेत करणार प्रवास

सामान्य नागरिक- अधिकृत तिकिट,मासिक पासावर पहाटे पहिल्या लाेकल पासुन ते सकाळी ७.३० वाजेपर्यत, सकाळी ११ ते दुपारी ४.३० आणि रात्री ८ ते शेवटच्या लाेकलपर्यत प्रवासास मुभा.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी- अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी ज्यांच्याकडे क्यु आर काेड आणि आेळखपत्र आहे.ते प्रवासी सकाळी ८ ते स.१०.३० वाजेपर्यत, संध्याकाळी ५ ते ७.३० वाजेपर्यत प्रवास करु शकणार आहेत.

काय म्हणते रेल्वे

काेराेना काळात साेशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करुन उपनगरीय लाेकल सेवा सुरु करण्यासाठी रेल्वे प्रशासन नेहमीच सज्ज आहे.राज्य शासनाने पाठविलेल्या पत्रानुसार त्यावर सरकारी यंत्रणाशी सविस्तर चर्चा करुन अतिरिक्त सेवा पुरविण्यावर काम केले जाईल असे मध्य रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.येत्या ४ ते ५ दिवसात मुंबईकरांना लाेकल प्रवास करता येईल असे रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

दिवाळीनिमित्त एसटीच्या दररोज 1 हजार जादा फेऱ्या

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी कोरोना पॉझिटिव्ह