विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मनसुख हिरेन हत्येवरुन सचिन वाझेवरील आरोपाने चांगलेचं तापलेले पाहायला मिळाले. विरोधी पक्षनेत्यांच्या आक्रमकतेनंतर सचिन वाझे यांच्या बदलीचे आदेश देण्यात आले. मात्र जर मंत्र्यांचा राजीनामा होतो, मग सचिन वाझे यांना इतके संरक्षण का? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.
विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पत्रकारांशी बोलताना नेक प्रश्न उपस्थित केले. ‘शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्या राजीनामाच्याबाबत निर्णय होऊ शकतो मग सचिन वाझेंच्या संदर्भात इतकं संरक्षण का मिळतं. काय इतकं सचिन वाझेंकडे आहे ज्यामुळं सरकार त्यांना घाबरतं, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.
अधिवेशनात मनसुख हिरेन प्रकरणात विरोधी पक्षनेत्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सचिन वाझेंच्या बदलीचे आदेश देण्यात आले.मात्र, भाजप अजूनही वाझेंच्या निलंबनाच्या मागणीवर ठाम आहे.तसेचं मनसुख हिरेन यांना जिथंपर्यंत न्याय मिळत नाही, तोवर आमचा लढा सुरू राहील असे फडणवीस यांनी सांगितले.
Comments
Loading…