in

वीर जवानांच्या बलिदानाचा अपमान का करतंय? राहुल गांधीचा सरकारला सवाल

लोकशाही न्यूज नेटवर्क

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भारत आणि चीनमध्ये पूर्व लडाखमधील पँगाँग लेक येथे असलेल्या सीमेवरून समेट झाल्याची माहिती राज्यसभेत दिली. यानंतर आता विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर टीका केली आहे. या ट्विटमध्ये “केंद्रीय संरक्षण मंत्र्यांनी भारत आणि चीन सीमेवरील सद्यस्थितीची कोणतीही माहिती दिली नाही, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर वातावरण शांततापूर्ण नाही आहे. असा दावा करत, सरकार आपल्या वीर जवानांच्या बलिदानाचा अपमान का करत आहे आणि आपला भूभाग चीनला का देत आहेत, असा सवाल राहुल गांधी यांनी ट्विटरवरून केला आहे.

भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये पँगाँग सीमेवरून सहमती झाली आहे. एप्रिल २०२० च्या पूर्वीची स्थिती कायम ठेवली जाणार आहे. चीनने आतापर्यंत या भागात केलेले बांधकाम जमीनदोस्त केले जाणार आहे, अशी माहिती राजनाथ सिंह यांनी दिली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मोदींनी वाचलेल्या पत्राचा ‘हा’ आहे दुसरा भाग, सुप्रिया सुळेंनी केला खुलासा

शेतकरी आंदोलनात मृत्यू झालेल्यांना वाहिली राहुल गांधींनी श्रद्धांजली, पण…