in

‘त्या’ 12 आमदाराच्या नियुक्त्यांबाबत भाजप राज्यपालांना का विचारत नाही ? संजय राऊतांचा सवाल

राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची नियुक्ती अद्याप झाली नसल्यानं त्यावरुन जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. त्यामुळे या नियुक्त्यांबाबत भाजप राज्यपालांना प्रश्न का विचारत नाही ? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

महाविकास आघाडी सरकारकडून 12 जणांची नावं राज्यपालांकडे पाठवण्यात आली होती.पण राज्यापालांनी त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे त्या १२ नावांच्या यादीच काय झाल? अद्याप त्या यादीला मंजुरी का मिळाली नाही ? याबाबत भाजप राज्यपालांना का विचारत नाही ? असा संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची यादी पाठवून सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला. त्याबद्दल काय झालं याचा खुलासा होणं गरजेचं आहे. अभ्यास करत आहेत वैगेरे ठीक आहे, त्यातून त्यांना काही पीएचडी करायची आहे का? जी नावं पाठवली आहेत ती जास्तीत जास्त काळ आपल्या मांडीखाली कशी दाबून ठेवता येतील यासंदर्भात एखादा गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड करायचा आहे का असा प्रश्न आहे,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

What do you think?

-2 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘फडणवीस रोज पहाटे ४ वाजता राज्यपालांना फोन करतात’….

‘देवेंद्र फडणवीस मोदींपेक्षा मोठे नेते असावेत’ संजय राऊतांचा टोला