in

काँगेसचा अध्यक्ष कोण ? महाराष्ट्रातील ‘या’ दिग्गज नेत्याचे नाव चर्चेत

Share

काँगेसमध्ये सध्या अध्यक्ष पदावरून अंतर्गत वाद सुरु झालाय. एकीकडे काही दिग्गज नेत्यांना नव्या अध्यक्षपद बदलाची शक्यता आहे, तर दुसरीकडे काही नेते राहुल गांधी याच्याकडे अध्यक्ष पद सोपवण्यास आग्रही आहेत. विशेष म्हणजे या सर्व शर्यतीत काही गांधी कुटुंबाबाहेरील दिग्गज नेत्यांचीही नाव चर्चेत आहेत. दिग्गज नेते मुकुल वासनिक यांच्याकडे अध्यक्षपद सोपवण्याचीही राजकीय चर्चा आहे. यामुळे आता काँग्रेसला नवीन अध्यक्ष मिळेल की पुन्हा पक्षाचं नेतृत्व गांधी घराण्याकडेच राहील ? याकडे आता पक्ष कार्यकर्त्यांचं लक्ष लागून आहे.(महाराष्ट्र कॉंग्रेसमध्ये फुट ? सुनिल केदार यांचा वरिष्ठ नेत्यांना टोला)

काँग्रेसच्या 23 नेत्यांनी लिहिलेल्या पत्रात गल्लीपासून दिल्लीपर्यत बदल करत नवीन पक्षाध्यक्षाची मागणी केली आहे तर दुसरीकडे काहींनी राहुल गांधी यांच्याचकडे पुन्हा नेतृत्व द्यावीत अशीच आग्रही मागणी होतेय. यावरूनही पक्षांतर्गत दोन गट पडल्याचे चित्र पहायला मिळत आहे. यानंतर सोनिया गांधी पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. त्यातच राहुल गांधी मात्र अध्यक्षपद पुन्हा स्वीकारण्यास तयार नसल्याचेही राजकीय सूत्रांची माहिती आहे.

अध्यक्षपदासाठी ‘या’ तीन नावांची चर्चा

दरम्यान जर सोनिया गांधी यांनी राजीनामा दिल्यास अध्यक्षपदाचे नेतृत्व कोणाकडे सोपवणार हा प्रश्न काँग्रेससमोर असेल. सध्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत तीन नावांची चर्चा होत असून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, एके अँटनी किंवा महाराष्ट्रातील जेष्ठ नेते मुकुल वासनिक यांच्याकडे हंगामी अध्यक्षपद दिलं जाऊ शकतं अशी राजकीय सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, काँग्रेस कार्यकारिणीच्या आज सकाळी ११ वाजता होणाऱ्या बैठ्कीत या संदर्भातला निर्णय आहे. या निर्णयाकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

सोलापुरात साकारली गणरायाची हरित प्रतिमा, अर्धा एकर शेतात कलेचा आविष्कार!

‘चीनबरोबर चर्चा निष्फळ ठरल्यास लष्करी कारवाईचा पर्याय’