in

हिंदू धर्मात दोन पत्नी अमान्य आहेत तर भाजपाचे नेतेही टेन्शनमध्ये येतील : सचिन सावंत

Share

लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात रेणू शर्मा नामक महिलेने बलात्काराचा आरोप करत ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर राजकारणात एकच खळबळ उडाली होती.

त्यातचं आता भाजपने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यातच आता राजकीय वर्तुळातून या प्रकरणावर प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी हिंदू धर्मात दोन पत्नी अमान्य असतील तर भाजपच्याच अनेक नेत्यांची कोंडी होईल, अशी खोचक टिका केली आहे.

हिंदू धर्मात दोन पत्नी चालत नाहीत आणि त्याला न्यायही नाही. धनंजय मुंडे यांनी राजीनामा न दिल्यास आम्ही रस्त्यावर उतरु, असा इशारा महाराष्ट्र भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांनी दिला आहे.
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी सोशल मीडियाद्वारे हिंदू धर्मात दोन पत्नी अमान्य या भाजपा महिला आघाडीच्या मागणीनंतर भाजपमधीलच काही नेते टेन्शनमध्ये आले असतील अशी खरमरीत टीका केली आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

अभिनेता सोनू सूदने घेतली शरद पवारांची भेट

पाहा विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या मुलीचा फोटो