in

पंढरपुरात गॅसचा स्फोट, मोटारसायकल जळून खाक

Share

पंढरपूर शहरात आज दुपारी बेकायदेशीरपणे गॅस भरताना गॅस टाकीचा स्फोट झाला. या स्फोटामुळे पत्र्याची खोली जळून खाक झाली. ही घटना शहरातील महात्मा फुले चौकात घडल्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

बेकायदेशीरपणे एका टाकीतून दुसऱ्या टाकीत गॅस भरताना हा स्फोट झाल्याची माहिती आहे. या स्फोटामध्ये एक मोटारसायकल जळून खाक झाली आहे. चौकातील एका पत्र्याच्या खोलीत बेकायदेशीरपणे गॅस भरत असताना हा स्फोट झाल्याची प्राथमिक आहे. स्फोट झाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन वेळीच आग विझवली. वेळीच आग विझवल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्फोट झाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून ऑन गॅस स्फोट प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

राज्यभरात आज ”वंचित” कडून डफली बजाओ आंदोलन

Pranab Mukherjee Health

Pranab Mukherjee Health Update;माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती चिंताजनक