in ,

भूमिपुत्रांनो आत्मनिर्भर व्हा… महाराष्ट्राला वाचवण्याचा निर्धार करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Share

३१ मेपर्यंत देश आणि आपला महाराष्ट्रही लॉकडाउनमध्ये आहे. मी आलो की लॉकडाउनच जाहीर करतो असं तुम्हाला वाटत असेल. साहजिक आहे, किती काळ लॉकडाउनमध्ये काढणार ? याला काही उत्तर आहे का? जगात कुणाकडे कोरोनाचं उत्तर नाही. युद्ध नेहमी शस्त्राने लढलं जातं. मात्र इथे हातात शस्त्र नाही. अंतर ठेवणं आणि जिंकणं हे कठीण आहे. लॉकडाउन वाढवणं हे काही अंशी नक्कीच बरोबर आहे. महाराष्ट्रात आणि मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. नाशिक, पुणे, औरंगाबाद या ठिकाणीही संख्या वाढते आहे. पण त्याबरोबरच हे संकट संपवण्याची डेडलाईनही जाहीर करणं गरजेचं आहे असं उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या मार्फत जनतेशी संवाद साधताना सांगितले.

 • ग्रीनझोनमध्ये शिथीलता आणली आहे, ऑरेंजझोनमध्ये खबरदारी घेत आहोत, मात्र रेडझोनमध्ये नाहीच – मुख्यमंत्री
 • आजपर्यंत आपण ५० हजार उद्योग सुरु करण्यास परवानगी दिली आहे, त्यामध्ये साधारण ५ लाख कामगार काम करत आहेत – मुख्यमंत्री
 • जगात पॉझचं बटण दाबलं आहे, आपल्याला भरारी घ्यायची आहे ती नक्की घेऊ – मुख्यमंत्री
 • महाराष्ट्रात ४० हजार एकर पेक्षा जास्त जमीन उद्योगांसाठी राखीव, जे लोक नवीन ग्रीन उद्योग सुरु करु इच्छित असतील, जे कोणतेही प्रदूषण करणार नाही, त्यांना कोणत्याही अटी नाही – मुख्यमंत्री
 • ४० हजार एकरपेक्षा जास्त जमीन नव्या उद्योगांसाठी राखीव ठेवल्या आहेत – मुख्यमंत्री
 • ग्रीन झोनमध्ये एकही रुग्ण वाढू द्यायचा नाही तसेच रेड झोनला ग्रीनमध्ये आणायचा आहे – मुख्यमंत्री
 • आपल्यासमोर दोन मोठी आवाहन आहे, एक म्हणचे ग्रीन झोनला कोरोना विरहित ठेवायचा आहे, या ठिकाणी कोरोना रुग्ण आढळणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर दुसरं म्हणजे रेड झोनला ग्रीन झोन करायचं आहे – मुख्यमंत्री
 • कामगार परराज्यात गेले आहेत, आता भूमिपुत्रांना आवाहन आहे, जिथे जिथे ग्रीन झोनमध्ये आहात, तिथे पंतप्रधान यांनी सांगीतल्या प्रमाणेआत्मनिश्चयाने बाहेर पडा, आत्मनिर्भर व्हा.. महाराष्ट्राला वाचवण्याचा निर्धार करा – मुख्यमंत्री
 • माझा महाराष्ट्र मोदींच्या भाषेत आत्मनिर्भर करण्यासाठी मी पुढाकार घेत आहे हे तरुणांनी देशाला दाखवा, भूमिपुत्रांनी पुढे या, आपला महाराष्ट्र आपल्या पायावर उभं करु – मुख्यमंत्री
 • मुंबईत ठिकठिकाणी बीकेसी, गोरेगाव, वरळी, रेसकोर्ट, मुलुंड, ठाणे अशा ठिकाणी केवळ कोविड-१९ सेंटर नसेल तर जम्बो फॅसिलिटीचा प्रयत्न करु, सर्वांना व्हेंटिलेटरची गरज नाही पण ऑक्सिजन लागतो, त्याची व्यवस्था करतोय, आयसीयू बेड वाढवत आहोत, इतरत्र कुठे नसेल तशी आरोग्य व्यवस्था उभी करायची आहे – मुख्यमंत्री
 • ऑक्सिजनची सुविधा असणाऱ्या बेडची सुविधा जास्तीत जास्त करत आहोत, रुग्णालयाबाहेर इतरत्र सेंटर्समध्ये सोयी सुविधा दिल्या आहेत – मुख्यमंत्री
 • संकट आहे, काही ठिकाणी बेड मिळत नाही अशा तक्रारी आहेत, पण त्या सुद्धा दूर होतील, नवीन सुविधा करतोय, मला कोविड योद्धे डॉक्टरांची आणखी गरज आहे – मुख्यमंत्री
 • मला अजूनही कोविड-१९ योद्धा हवे आहेत, पोलीस थकतात, आजारी पडतात, गडचिरोलीत नक्षलवाद्यांशी लढताना दोन पोलीस शहीद झालेत – मुख्यमंत्री
 • डॉक्टर, नर्स, पोलिसांना त्या त्या वेळी विश्रांती देणे गरजेचे आहे, त्यामुळे मला कोव्हिड योद्ध्यांची गरज आहे, ज्यांना कुणाला मदतीला यायचं आहे त्यांचं स्वागत आहे – मुख्यमंत्री
 • मुंबईत १९ हजार रुग्ण आहेत, मात्र त्यापैकी ५ हजार बरं होऊन घरी परतले आहेत, त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे – मुख्यमंत्री
 • आज मुंबईत आज १९ हजार रुग्ण पॉझिटिव्ह आहे, त्यातील ५ हजार रुग्ण बरे झाले आहेत, दुर्देवाने काहींचा मृत्यू झाला. याचा अर्थ वेळेत आलात तर बरे होता येते – मुख्यमंत्री
 • राज्यभर आरोग्य सुविधा वाढवत आहोत, शक्य ती सर्व पावलं उचलत आहोत – मुख्यमंत्री
 • रुग्णवाहिका, व्हेंटिलेटर्स इतर आरोग्य सोयी सुविधा वाढवत आहे – मुख्यमंत्री
 • लॉकडाऊन जर उठवला तर इटली, ब्राझीलमध्ये जे काही होतंय ते इथे होईल, त्यामुळे लॉकडाऊन हटवणार नाही, माझ्यावर टीका झाली तर होऊदे, महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी टीका सहन करेन, रेड झोनमध्ये तूर्तास सूट नाही – मुख्यमंत्री
 • मी महाराष्ट्रासाठी टीकेचा धनी होईन, मात्र मला जे योग्य वाटेल ते ते मी करणारच – मुख्यमंत्री
 • मजुरांची आपण काळजी घेतली, ५ ते ६ लाख मजुरांची जेवणा खाण्याची सोय केली, त्यांना घरी जायचं होतं, त्यासाठी प्रयत्न केले, जवळपास ५ लाख मजुरांना त्यांच्या त्यांच्या राज्यात पाठवले आहे – मुख्यमंत्री
 • इतर राज्यातील मजूर रस्त्यात का चालताय, तुमच्यासाठी आधीच ट्रेनची सोय केली आहे, तुमच्या प्रत्येकासाठी बस, ट्रेनची सोय केली आहे, ते तुमची सोय करत आहेत – मुख्यमंत्री
 • जे मजूर रस्त्याने चालत जात आहेत, त्यांनी कृपा करुन तो कठीण मार्ग पत्करु नये, तुमच्यासाठी रेल्वे, बसची सुविधा केली आहे, आहे तिथेच थांबा, तुम्हाला पूर्ण सुरक्षितपणे तुमच्या राज्यात पाठवू – मुख्यमंत्री
 • ज्या मजुरांना पाठवलं, त्या मजुरांकडून तिकीटाचे पैसे घेतले नाहीत, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पैसे दिले, मुंबईत राहणारी पश्चिम महाराष्ट्र, कोकणातील लोकांनाही घरी पाठवणार, पण अस्वस्थ होऊ नका – मुख्यमंत्री
 • कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांकडूनही विचारणा होत आहे, बाहेरच्यांना पाठवलं आम्हाला कधी पाठवणार? पण तुम्ही तर आमचे आहात, तुम्हालाही पोहचवू, कृपा करुन तुम्ही चालत जाऊ नका – मुख्यमंत्री
 • कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील लोकांनी कृपया तुम्ही तरी चालत जाऊ नका, जर तुम्हाला खरचं जायचं का, गरज आहे का? याचा विचार करा – मुख्यमंत्री
 • तुम्ही गावी जाण्याऐवजी धीर धरला तर सर्वांसाठी बरं होईल, काही ग्रीन झोनमध्ये मुंबई-पुण्यातून गेलेले लोक पॉझिटिव्ह आढळले, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचाही तुम्ही विचार करा, थोडा धीर धरा – मुख्यमंत्री
 • परदेशातूनही लोक आता येत आहेत, मात्र विलगीकरण हे आवश्यक आहे, तुम्हाला काही लक्षणं नसली तरी तुम्ही वाहक होऊ नका – मुख्यमंत्री
 • कोकणात, पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना थोडा धीर धरा, गावी जाण्याची घाई करु नका, महाराष्ट्रावर उपकार करा – मुख्यमंत्री
 • घरात राहा सुरक्षित राहा हे आतापर्यंत पाळलं, यापुढे घराबाहेरही सावध राहा, हात सतत धुवत राहा, तोंडाला रुमाल, मास्क लावा, हात वारंवार चेहऱ्यावर फिरवू नका, हे आपल्याला पुढील काही महिने पाळावं लागेल – मुख्यमंत्री
 • इतके दिवस शिस्त पाळली, आता कडक शिस्त पाळा, कंटेन्मेंट झोनमध्ये लोक बाहेर पडत आहेत, पण बाहेर पडू नका, धार्मिक कार्यक्रमही आपण थांबवले आहेत – मुख्यमंत्री
 • जी शिस्त पाळली ती अजून जास्त हवी आहे, कडक पाळली पाहिजे, धार्मिक सण उत्सव साजरे करण्यास परवानगी नाही – मुख्यमंत्री
 • ग्रीन झोनमध्ये आपण दुकानं सुरु ठेवण्यास परवानगी दिली, यापुढे खबरदारी घेऊन ही दुकानं बंद करावी लागू नयेत, याची काळजी घ्यावी – मुख्यमंत्री
 • कोणतीही गोष्ट सुरु करण्यापूर्वी तुम्हाला कल्पना द्यायची असं ठरवलं आहे. कारण एकदा सुरु केलेली गोष्ट पुन्हा बंद करायचं नाही – मुख्यमंत्री
 • शैक्षणिक वर्ष वाया जाऊ द्यायचं नाही, अॅडमिशन, निकाल आहेत, हे संकट आपल्याला पावसाळ्यापूर्वी संपवायचं आहे – मुख्यमंत्री
 • हे संकट आपल्याला परतवून लावायचं आहे, जनजीवन आपण पूर्वपदावर आणायचं आहे, पण हे सुरळीत होण्यास वेळ लागेल, आपण जेवढी खबरदारी घेऊ तेवढं लवकर आपण या बंधनातून मुक्त होऊ – मुख्यमंत्री
 • आता आपल्याला जनजीवन पुन्हा सहजतेने जगायला सुरुवात करायची आहे, मात्र हे सुरळीत करायला अजून वेळ लागणार आहे, आतापर्यंत जसं सहकार्य केलं तस यापुढेही कराल याची आशा बाळगतो – मुख्यमंत्री
Uddhav Thackeray Live | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जनतेशी संवाद

Uddhav Thackeray Live | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जनतेशी संवाद #Coronavirus #UddhavThackeray#PC#Live #कोरोना #मुख्यमंत्रीउद्धवठाकरे

Posted by Lokshahi News on Monday, May 18, 2020

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Exclusive | आता गुंतवणुकदारांनी उद्योग सुरू करावेत – उद्योग मंत्री सुभाष देसाई

अप्सरा सोनाली कुलकर्णीचा साखरपुडा झाला! वाढदिवसाच्या दिवशी शेयर केली गुड न्यूज…