in

युझवेंद्र चहल जेव्हा त्या नवख्या खेळाडूची मुलाखत घेतो…

Share

क्रिकेटच्या मैदानावर बॅटसमनची विकेट उडवण्यासह मुलाखत घेण्यास माहीर असलेल्या युझवेंद्र चहलने आयपीएलच्या मैदानातही मुलाखत घेण्यास सुरुवात केली. यावेळी चहलने आरसीबी विरुद्ध हैद्राबाद संघात  झालेल्या सामन्यात आरसीबितून सर्वाधिक रन्स बनवणाऱ्या नवख्या अशा देवदत्त पल्लीकल याची मुलाखत घेतली.

आरसीबीने प्रथम फलंदाजी करत 5 विकेट गमावून 163 धावसंख्या उभारली होती. या धावसंख्येत देवदत्त पल्लीकल  या नवख्या खेळाडूने 42 बॉल्समध्ये 56 रन्स बनवले होते. त्यामुळे पहिल्याच सामन्यात त्याने आपली प्रतिभा दाखवून दिली होती. यानंतर  एबी डीव्हीलीयर्स 30 बॉल्समध्ये 51 रन्स काढले होते. त्या खालोखाल फिंचने  27 बॉल्स 29 रन्स बनवले होते. या धावसंख्येचा पाठलाग करायला उतरलेल्या हैद्राबादने सुरुवात चांगली केली. ब्रेस्टो 43 बॉल्स 61 धाव काढल्या. तर मनीष पांडेने 33  बॉल्स 34  रन्स केले. आणि गर्ग 12 बॉल्स 13 रन्स काढले होते. मात्र ते धावसंख्या पूर्ण काढू शकले नाही आणि 153 वर ऑल आऊट झाले.

दरम्यान या सामन्यानंतर चहलने देवदत्त पल्लीकल या नवख्या खेळाडूची  मुलाखत घेऊन त्याला सिनियर्स खेळाडूकडून काय शिकायला मिळाल असा प्रश्न विचारला, यावर त्याने मी सर्व सिनियर्स खेळाडूकडूना सतत प्रश्न विचारत राहिलो आणि त्यातूनच मी शिकत गेलो.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

भिवंडी इमारत दुर्घटना; मृत्यू संख्या पोहचली 20 वर

पालघर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला