in

Video…जेव्हा कोरोनाच्या संकटात वारीला निघालेल्या वारकऱ्याला ‘वर्दीतला विठ्ठल’ भेटतो!

Share

राज्यात कोरोना महामारी पसरल्याने यंदाची वारी रद्द करण्यात आली असली तरी, विठ्ठलाच्या भक्तीपायी काही वारकरी पायी निघालेत. अशाच पायी निघालेल्या एका वारकऱ्याला एका पोलिसाने अडवून ”विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला”,असा विठ्ठल संदेश देऊन माघारी जाण्याचे आवाहन केले.यावेळी वर्दीतल्या विठ्ठलाचे दर्शन घेऊन त्याने परतीचा प्रवास सुरु केला आहे.

आषाढी एकादशीचा सोहळा येत्या 1 जुलै रोजी असणार आहे. मात्र यंदाच्या वर्षी कोरोनाच्या महामारीने वारकऱ्यांना वारीसाठी पंढरपुरला जाता येणार नाही आहे. त्यामुळे कोरोना पार्श्वभूमीवर यंदाची आषाढीवारी पार पाडत असल्याने वारकऱ्यांनी पंढरपुरात येऊ नये यासाठी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक प्रसाद मनोहर औटी यांनी एक सूंदर व्हिडीओ बनविलेला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये वर्दीतला विठ्ठल वारकऱ्याला अडवून कोरोना महामारीच्या परिस्थितीची जाण करून देतो. त्याचसोबत विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला,असा संदेश देऊन माघारी जाण्याचे आवाहन करतो. तसेच कोरोनाची महामारी यंदाची वारी घरच्या घरी ! असा संदेश या व्हिडिओमधून देण्यात आला आहे.

दरम्यान विठ्ठल जळी स्थळी भरला I रिता ठाव नाही उरला I असा श्रीविठ्लाच्या सर्वव्यापक असण्याचा पुरावा देणाऱ्या या संप्रदाय अनुयायांना वारी घडली नाही तरी आषाढीला गावातल्याच मंदिरात पायी जावून कायिक सेवा करता येईल. दिवसभर श्रीविठ्ठलाचे चिंतन करून वाचिक सेवेचा लाभ घेता येईल आणि भल्या पहाटे उठून मानसपूजेच्या माध्यमातून श्रीविठ्ठलाची महापुजाही करता येईल. विशेष म्हणजे लाखोंचे प्राण सुरक्षित ठेवण्याच्या बदल्यात वारकऱ्यांनी केलेल्या या त्यागाने श्रीविठ्ठल देखील प्रसन्न होईल.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

या’ गोष्टी संभाळल्या तर कधीच प्रेमात ब्रेकअप होणार नाही

‘BoycottNetflix’ होतय ट्रेन्ड; ‘या’ सिनेमामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप