in

सगळं खुलं असताना, सणांवर निर्बंध का ? राज ठाकरेंचा राज्य सरकावर हल्लाबोल

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सण आणि उत्सव साजरे करण्यासाठी निर्बंध घातले. पण मनाई असतानाही मनसेने मनाई आदेश झुगारून दहीहंडी साजरी केली. मुंबईसह ठाण्यात मनसैनिकांनी दहीहंडी जल्लोषात साजरी केली. मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह मुंबई आणि ठाण्यात दहीहंडी साजरी करणाऱ्या काही मनसेसैनिकांची धरपकड करण्यात आली आहे. अशी माहिती सूत्रांकडून येत आहे. या संदर्भात महाराष्ट्र नव निर्माणसेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेवून आपली बाजू मांडली. यावेळी यांची मस्ती जिरवलीच पाहीजे अशा कठोर शब्दात राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.

यावेळी परप्रांतीयांच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली. त्याचप्रमाणे प्रत्येकवेळी सणांच्यावेळीच लॉकडाऊन का ? असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला. नियम करायचेच असतील तर ते सर्वांसाठी समान करा असा टोला देखील त्यांनी लगावला.

ठाण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडली हंडी
ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने दहीहंडी फोडून उत्सव साजरा केला. मनसे विद्यार्थी सेनेने लक्ष्मी पार्क, वर्तकनगर येथे दहीहंडी उभारत चार थराची हंडी फोडली. गोविंदांनी कोरोनाचे निर्बंध झुगारत ही हंडी फोडून मनसेचा झेंडा फडकवला. तर मनसेने नौपाडा येथील कार्यालयासमोर एक थराची हंडी फोडली. मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी ही दहीहंडी फोडली. कृष्ण जन्माष्टमी च्या दिवशी पूजाअर्चा करत मनसेच्या कार्यालयासमोर उभारण्यात आलेली दहीहंडी फोडण्यात आली.यावेळी पोलिसांनी मज्जाव केला होता. मात्र रितीरिवाजाप्रमाणे कमी उंचीची दहीहंडी बांधून ती फोडण्यात आली. जमावबंदीचे आदेश झुगारून मनसेसैनिकांनी घोषणा देतच दहीहंडी फोडली. त्यामुळे पोलिसांनी मनसे सैनिकांची धरपकड केली.

आम्हाला सण साजरा करण्यास बंदी का?
मनसे हे जे ठरवते ते करते. आम्हाला अनेक ठिकाणवरून फोन आले. उत्तर प्रदेशवरून देखील फोन आले. बाळासाहेबानंतर हिंदूंबाबत कोणी भूमिका घेतली असेल तर ती राज ठाकरे यांनीच. आम्हाला सण साजरा करण्यासाठी बंदी का? बाकी इतर कार्यक्रम होतात, पण सण का होऊ देत नाही? असा सवाल अविनाश जाधव यांनी केला आहे. आम्ही आमचे काम करणार. पोलिसांनी त्यांचे काम करावे. आता देखील काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, असं त्यांनी सांगितलं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

रत्नागिरीमधील मनोरुणालयात २० रुग्णांना कोरोनाची लागण

बोटं छाटणारा बाहेर येऊ दे, यांची सर्व बोटं छाटली जातील