in

…जेव्हा बॉलीवूडचा सिंघम अजय देवगण करतो नंदुरबार जिल्हाधिकाऱ्याच्या कार्याचे कौतुक

Share

अविनाश सोनावणे : एखाद्या अधिकाऱ्याच्या चांगल्या कामाचे कौतुक वरिष्ठ अधिकाऱ्यांने अथवा मंत्र्यांने केले तर त्यात काही नवल वाटायला नको. मात्र येथे चक्क बॉलीवूडचा सिंघम अभिनेता अजय देवगण याने नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. विशेष म्हणजे या संदर्भातली अजय देवगण यांची क्लिप व्हायरल होत आहे. त्यामुळे नेमकं जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी असं काय काम केले आहे, ज्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे ते जाणून घेऊयात.

नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या कार्याची दखल चक्क बॉलिवूडचा सिंगम अजय देवगण याने घेतली आहे. सोलापूर जिल्ह्यात कार्यरत असतांना गावातील सरपंचा सोबत क्षयरोग निर्मूलनाचे उत्कृष्ट काम केले होते. त्यातच नंदुरबार सारख्या आदिवासी दुर्गम भागात साथीच्या आजारापासून नागरिकांचा बचाव व्हावा यासाठी दिवसरात्र काम सुरू आहे.

जिल्हाधिकारी भारुड यांच्या या कामाची दखल सिनेअभिनेता अजय देवगण याने घेतली असून या संदर्भातला एक छोटा व्हिडीओ रेकॉर्ड करून आपल्या फॅन्सपर्यंत पोहचवला.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

ऊर्मिला मातोंडकरांच्या शिवसेना प्रवेशावर भाजप खासदार प्रीतम मुंडे म्हणाल्या…

Record increase in the number of coronaries

राज्यात आज सापडले 3 हजार 837 नवे कोरोना रुग्ण