in

व्हॉट्सअ‍ॅप युजर्सला मिळणार दोन नवीन फीचर्स

Share

इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप अँड्राईड युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत आहे. कंपनी आता एक नवीन कॉल बटन, डूडल ऑप्शन आणि बिझनेस अकाउंट्साठी नवीन कॅटलॉग शॉर्टकट आणणार आहे. Add WhatsApp Doodles या फीचरवर सध्या कंपनी काम करत आहे. या फीचरच्या मदतीने युजर्स आपल्या वॉलपेपरला अधिक आकर्षक आणि मजेदार बनवू शकतील.

तसेच व्हॉट्सअ‍ॅप एका नवीन कॉल बटन फीचवर देखील काम करत आहे. हे नवीन कॉल बटन व्हिडीओ कॉलिंग आणि वॉयस कॉलिंगचे कॉम्बिनेशन असेल. युजर्सला दोन्ही कॉलिंगसाठी एकच बटन मिळणार आहे. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार हे फीचर अँड्राईडच्या बिटा व्हर्जनमध्ये पाहण्यात आले आहेत. नवीन फीचर अँड्राईडच्या लेटेस्ट व्हॉट्सअ‍ॅप 2.20.200.3 बीटा व्हर्जनमध्ये टेस्ट केले जात आहेत. व्हॉट्सअ‍ॅप बिझनेस अकाउंटसाठी कॅटलॉग शॉर्टकट देखील आणणार आहे. कॅटलॉग शॉर्टकटमुळे प्रोडक्ट पोर्टफोलियाचा लवकर अ‍ॅक्सेस मिळेल. व्यापाऱ्यांना यामुळे फायदा होईल.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

रेस्टॉरंट, मंदिरं सुरू करण्याचा विचार, लोकलला मात्र रेड सिग्नल!

रिया चक्रवर्तीचा मुक्काम जेलमध्येच