in

व्हॉटसअप, इंस्टाग्राम, फेसबूकचा सर्व्हर डाऊन ?

व्हॉटसअप, इंस्टाग्राम, फेसबूक या सारखी सोशल माध्यमांचे सर्व्हर डाऊन असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत अनेक युझर्सच्या तक्रारी समोर येत आहेत. मात्र अद्याप या सोशल माध्यमांकडून सर्व्हर डाऊन असल्याची माहिती युझर्सला देण्यात आली नाही. मात्र अनेक युझर्सना या समस्यांना सामोर जावे लागत आहे.

गेल्या 15 ते 20 मिनिटांपासून व्हॉटसअप,इंस्टाग्राम, फेसबूक युझर्सना तांत्रिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नेटवर्क असून सूद्धा मेसेजेस सेंड होत नाही आहेत. व्हॉट्सअ‌ॅपचे सर्व्हर अचानकपणे बंद पडले आहे. सर्व्हर बंद पडल्यामुळे सगळ्या सुविधा बंद झाल्या आहेत. मेसेजिंग, व्हिडीओ कॉल, ग्रूप चॅट, ही सर्व फिचर्स सध्या बंद पडली आहेत. हा प्रकार साधारणपणे मागील वीस मिनिटांपासून जाणवत आहे.  व्हॉट्सअॅप अचानकपणे बंद पडल्यामुळे ट्विटरवर व्हॉट्सअ‌ॅप डाऊनचा ट्रेण्ड सुरु झाला आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात तज्ज्ञ असणाऱ्या व्यक्तींनासुद्धा यामागचं नेमकं कारण अजून समजू शकलेलं नाही.याबाबत अनेक युझर्सच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे नेटकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

फेसबुक तसेच फेसुकच्या मालकीचे असलेले मेसेजिंग अॅप मेसेंजरसुद्धा डाऊन झाले आहे. कोणतेही संदेश जात किंवा येत नाहीयेत. संदेश वहनास अडचणी येत असल्यामुळे नेटकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. या समस्येवर फेसबूक काम करत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वसईत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अपमान; शिवसेनेकडून पोलिसांत तक्रार

Maharashra Corona | रूग्णसंख्या खालावली, २ हजार २६ नवीन बाधित