in

Privacy Policy: ‘या’ तारखेपर्यंत स्वीकाराव्या लागणार WhatsApp च्या नव्या अटी

प्रायव्हसी पॉलिसीमध्ये बदल केल्यामुळे चर्चेत आलेल्या WhatsApp मेसेजिंगने आता पुन्हा आपल्या गोपनीयता संबंधित अटी व धोरणे पुन्हा लागू करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. WhatsApp ने गुरूवारी आपली नवीन प्रायव्हसी पॉलिसी जारी केली आहे.

अ‍ॅपमध्ये एका छोट्या बॅनरद्वारे युजर्सना आपली नवीन पॉलिसी समजावण्याचा WhatsApp चा प्रयत्न आहे. 15 मे पर्यंत ही पॉलिसी स्वीकारावी लागेल. जानेवारीमध्ये नवीन प्रायव्हसी पॉलिसी जारी केल्यानंतर WhatsApp वर जगभरातून टीका झाली, त्यानंतर कंपनीने नवीन पॉलिसी लागू होण्याची तारीख पुढे ढकलली होती. टीका झाल्यानंतरही कंपनीने आपल्या पॉलिसीमध्ये बदल केलेला नाही,

पॉलिसीमध्ये बदल झाल्याने मित्र किंवा कुटुंबियांसोबत केलेल्या तुमच्या चॅटिंगच्या गोपनियतेवर कोणताही परिणाम होत नाही, असं स्पष्टीकरण WhatsApp कडून देण्यात आलं आहे. तसेच, नवीन पॉलिसी केवळ बिजनेस युजर्ससाठी आहे असा दावाही कंपनीने केलाय. ‘तुमचे खासगी मेसेज आधीप्रमाणेच 100 टक्के एंड-टू-एंड एन्क्रिप्शनअंतर्गत सुरक्षित ठेवले जातील. पॉलिसीमध्ये बदल झाल्याने मित्र किंवा कुटुंबियांसोबत केलेल्या तुमच्या चॅटिंगच्या गोपनियतेवर कोणताही परिणाम होणार नाही असं स्पष्टीकरण व्हॉट्सअ‍ॅपने दिलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Video ; अवघ्या 3 से.मी रांगोळीत साकारले शिवराय

दिग्पाल लांजेकरने उचलले ‘शेर शिवराज है’ चे शिवधनुष्य