in

टूलकिट म्हणजे नक्की काय ?

लोकशाही न्यूज नेटवर्क

नव्या कृषी कायद्याच्या संदर्भात टूलकिट तयार केल्या प्रकरणी बंगळुरूतील २२ वर्षीय पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी हिला दिल्ली पोलिसांनी अटक केली. टूलकिट हा शब्दप्रयोग सर्वांसमोर आला. दिशाच्या अटकेनंतर देशातील राजकारण चांगलंच तापलं आहे. तर दुसरीकडे अनेकांच्या मनात टुलकिट याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

‘टूलकिट’ म्हणजे काय ?
जगभरात होत असणाऱ्या घटनांचे पडसाद सोशल मीडियायावर उमटता असतात. अमेरिकेतील black lives matter चळवळ असो, लॉकडाउन विरोधी आंदोलन किंवा पर्यावरणाशी निगडित climate strike campaign अशा मोठ्या स्वरूपाची आंदोलन करताना त्याचा एक कृती कार्यक्रम तयार केला जातो. आंदोलन आणखी पुढच्या टप्प्यावर नेणं वा तीव्र करणं करण्याच्या उद्देशानं हे तयार केलं जातं. ज्यामध्ये हा कृती कार्यक्रम नोंदवण्यात येतो, त्याला टूलकिट असं म्हटलं जातं.

‘टूलकिट’चा वापर
आंदोलन करताना पोस्टर किंवा पत्रक खूप महत्वाची भूमिका बजावत असतात. आजकालच्या सोशल मीडियाच्या जगात टूलकिट पोस्टरची भूमिका बजावते. लोकांच्या सहभागामुळे आंदोलनाची तीव्रता आणखी वाढू शकते वा त्यांची मदत आंदोलनासाठी होऊ शकेल अशा लोकांना टूलकिट शेअर केली जाते. आंदोलकांमध्ये समन्वय साधण्याचं काम टूलकिटच्या माध्यमातून केलं जातं. त्याचबरोबर आंदोलनासंदर्भात काय लिहिलं जाऊ शकतं, कोणते हॅशटॅग वापरायला हवे, कोणत्या वेळेत ट्विट केल्यास फायदा होऊ शकतो आणि कुणाचा उल्लेख ट्विटमध्ये वा फेसबुक पोस्टमध्ये केल्यास प्रभावी ठरेल, अशी माहिती असते.

‘टूलकिट’चा काय परिणाम होतो
सोशल मीडियावर अनेकवेळा आपल्याला वेगवेगळे हॅशटॅग ट्रेडिंगमध्ये असल्याचं बघायला मिळतं. एकाचवेळी अनेकांनी ट्विट करून तो हॅशटॅग वापरल्यानं हा परिणाम दिसून येतो. टूलकिटच्या माध्यमातून लोकांना समर्थन देण्याचं आवाहन करण्याबरोबरच त्या आंदोलनासंदर्भातील हॅशटॅग वापरून ट्विट करण्याचं आवाहन केलं जातं. टूलकिट फक्त आंदोलनासाठीच वापरली जाते असं नाही, तर राजकीय पक्षांकडून मोठ्या कंपन्यांकडूनही त्याचा वापर केला जातो.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पूजा आत्महत्या प्रकरण : भाजपा आमदार अतुल भातखळकर यांना धमकीचे फोन!

टूलकिट मुद्दा : दिशानंतर निकिता जेकबविरोधात अटक वॉरंट