in

भगवान रामलल्लाचे कपडे भगवे की हिरवे, 5 तारखेला कोणते कपडे परिधान करणार?

What clothes will Lord Ramallah wear on the 5th, orange or green?
What clothes will Lord Ramallah wear on the 5th, orange or green?
Share

सध्या संपुर्ण देशभरात राम मंदिरावरून चर्चा रंगत आहेत, त्यातच येत्या 5 ऑगस्टला राम मंदिराचे भूमिपूजन होणार असून या कर्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदीही जाणार असल्यचं नक्की झालय. पंतप्रधान मोदी या भुमिपूजनाच्या कार्यक्रमाला जाण्याअगोदर भगवान रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत, मात्र या रामलल्लाच्या कपड्यावरून आणखी एक वाद समोर आला आहे, तो म्हणजे भगवान रामलल्ला यांना 5 ऑगस्ट रोजी कोणते कपडे परिधान करणार?

अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाची तयारी जोरात सुरू आहे. 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत भूमीपूजनासाठी जाणार आहेत. यासोबतच अयोध्येत रामलल्लासाठी नवीन कपड्यांची तयारदेखील केली जात आहेत. असं म्हटलं जात आहे, पीएम मोदी अयोध्येत भूमिपूजन करण्यापूर्वी भगवान रामलल्ला यांचे दर्शन घेतील, यावेळी भगवान रामलल्ला यांना कोणते कपडे परिधान केले जातील, यावरून चर्चा सुरू झाल्या आहेत.

अयोध्येत, शिंपी काम करणारे भागवत प्रसाद आणि शंकर लाल, हे ‘रामलल्ला’साठी कपडे शिवण्याची तयारी करत आहेत. शंकर लाल यांच्या मते ‘ही आमची चौथी पिढी आहे, जी रामच्या मूर्तीसाठी कपडे बनविण्याचं काम करत आहेत. टेलर भागवत प्रसाद म्हणतात, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी अतिशय शुभ दिवशी अयोध्येत येत आहेत. इतक्या प्रदीर्घ प्रतीक्षाानंतर हा दिवस आला आहे. आमचा जन्म होण्यापूर्वीच मंदिराचा संघर्ष सुरू झाला होता, मात्र आता साक्षात मंदिर आम्हाला ते मंदिर पहायला मिळणार आहे.

5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत उभारल्या जाणार्‍या भव्य राम मंदिराची पायाभरणी करतील. यावेळी, सोशल डिस्टंसिंगचे पालन केले जाईल. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राचे खजिनदार स्वामी गोविंद देव गिरी यांनी ही माहिती दिली, ते पुढेही म्हणाले की 200 हून अधिक लोक पायाभरणी समारंभास उपस्थित राहणार नाहीत, त्यामुळे हा सोहळा अगदी छोटेखानी केला जाईल.

भगवान रामलल्ला यांच्या पोषाखात हिरव्या रंगाचा वापर करण्यात आला आहे. ज्यावेळेस भुमिपूजनाच्या दिवशी भगवान राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांना रथामध्ये बसवलं जाईल, त्यावेळेस त्यांना रत्नजडीत पोषाखांनी सजवलं जाईल. हा पोषाख हिरव्या रंगाचा असल्याची माहिती रामदल सेवादलाचे अध्यक्ष पंडित कल्कीराम भगवान राम यांनी दिली. भगवान राम यांना पंडित कल्किराम हेच भगवान राम यांना पोषाख परिधान करतील. भुमिजूजन बुधवारी होणार असल्याने भगवान राम यांना हिरव्या रंगाचे कपडे परिधान केले जातील आणि त्याला भगव्या रंगाची कडा आणि त्यावर रत्नजडीतांनी सुशोभले जाईल. या दिवसाचा शुभ रंग हिरवा असल्याचे मानले जाते.

5 ऑगस्टरोजी होणाऱ्या होणाऱ्या या महाभुमिपूजनाच्या कार्यक्रमामुळे अयोध्यातील प्रत्येक घराला सुशोभित करण्याचं काम सुरू आहे. काही घरांवर भगवान राम यांचे चित्रदेखील रेखाटले जात आहे, तर काही चित्रांच्या माध्यमातून भगवान राम यांचा जिवन प्रवास मांडण्याचा प्रयत्न केला आहे,

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Rafale India Live Updates : संपुर्ण अंबालामध्ये कलम 144 केलं लागू

‘खुलता कळी खुलेना’ मालिका फेम मयुरीच्या पतीने केली गळफास लावून आत्महत्या