in ,

West Bengal Assembly Polls | भाजपच्या उमेदवार यादीतून मिथुनदा गायब!

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने अंतिम उमेदवार यादी जाहीर केली. मात्र नुकतेच भाजपचा झेंडा हाती धरलेले दिग्गज अभिनेते आणि माजी खासदार मिथुन चक्रवर्ती यांना यादीत स्थान मिळालेलं नाही. रासबिहारी विधानसभा मतदारसंघातून मिथुनदा यांना तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती.

मंगळवारी भाजपने जाहीर केलेली पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांची उमेदवार यादी अखेरची मानली जाते. यामध्ये 13 जणांची नावं आहेत. रासबिहारी मतदारसंघातून मिथुनदा रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु तिथे निवृत्त लेफ्टनंट जनरल सुब्रत सहा यांना तिकीट देण्यात आलं आहे. साहांनी महत्त्वाच्या काळात भारतीय सैन्यासाठी काश्मीरची खिंड लढवली आहे.

सुवेंदू अधिकारींसाठी मिथुनदा प्रचार करणार

मिथुन चक्रवर्ती यांनी नुकतेच आपले मतदार कार्ड मुंबईहून कोलकात्याला ट्रान्सफर केले. त्यामुळे मिथुनदा रिंगणात उतरण्याची शक्यता बळावली होती. नंदिग्राममधून ममता बॅनर्जी यांना टफ फाईद देणारे नेते सुवेंदू अधिकारी यांच्यासाठी 30 मार्चला मिथुनदा प्रचार करणार आहेत. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रोड शो करण्याची चिन्हं आहेत.

मोदींच्या उपस्थितीत मिथुनदांचा पक्षप्रवेश

कोलकाताच्या ब्रिगेड परेड ग्राऊंडमध्ये सात मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी पश्चिम बंगालमधील प्रमुख भाजप नेत्यांच्या उपस्थितीत मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Imtiaz Jaleel : युती तुटल्याचा फटका जनतेला का?

वांद्रेतील ड्रग पुरवठा करणाऱ्या तरुणाला NCB कडून अटक