in

साप्ताहिक राशीभविष्य : 1 मार्च 2021 ते 7 मार्च, 2021

साप्ताहिक राशीभविष्य पाहताना, आपली मूळ पत्रिका आणि गोचर यांचा विचार केला जातो. चंद्र राशी आणि लग्न राशींचा सारासार विचार करुन, गोचरी प्रमाणे ग्रहांची स्थिती, युत्या आणि दृष्ट्या तसेच तिथी, वार, नक्षत्र, योग, करण यांचा परिणाम आपण दैनंदिन जीवनात अनुभवत असतो.

गोचारिमध्ये, आठवड्याच्या पूर्वार्धात चंद्राचं भ्रमण कन्या, मध्यंतरात तुला-वृश्चिक आणि उतरार्धात धनु राशीमध्ये आहे. मंगळ-राहुची स्थानयुती असली अंशात्मक फरक आहे. शुक्र अस्त, गुरु-शनि-बुध युती चे विशिष्ट फळ तसेच उत्तरार्धात चंद्र केतू ग्रहण योग यांचा विपरीत परिणाम आपल्याला सर्व राशींमध्ये पहावयास मिळेल.

 

नवीन कार्य आरंभ करण्यास,
शुभ दिवस : 3,4
अशुभ दिवस : 1,2,5,6,7

मेष :
तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा दबदबा कायम राहील. विरोधकांवर विजय मिळेल. कामाच्या निमित्ताने प्रवास होतील, पण प्रवासात काळजी घ्या. मुलांचे शिक्षणाचे योग संभवतात. कौटुम्बिक समस्या, प्रॉपर्टी खटले उद्भभवू शकतात. कर्जवृद्धी डोकेदुखी ठरू शकते. सासरच्या व्यक्तींशी वाद टाळा. पोटाचे किंवा पायाचे विकार सम्भवतात.
** शिवलिंगावर पाणी आणि गाईच्या दुधाचा अभिषेक करा.

वृषभ :
आर्थिक भाग्य चांगले असेल. अर्धवट राहिलेली काम मार्गी लागतील, कौटुम्बिक समाधान मिळेल. नवीन वाहन, जागा खरेदीचा योग येईल. जोडीदाराबरोबर वैचारिक मतभेद, जवळच्या व्यक्तींवर कष्ट, खर्च नुकसान संभवते. छातीपासून शरीराच्या वरच्या भागामध्ये इजा संभवते.
** बेलपत्र शिवलिंगावर वाहावे.

मिथुन:
बौद्धिक क्षमता प्रबळ, पण भाग्य आणि परिश्रमाची सांगड बिघडेल. नोकरीमध्ये बदल, कामाच्या ठिकाणी नवीन कामाच्या संधी उपलब्ध होतील. आत्मविश्वासाची कमी जाणवेल, तब्बेतीची कुरबुर चालू राहिल. जोडीदाराचे स्वास्थ बिघडेल. निर्जन परिसरात जाण्याचे टाळा. आपल्या भावंडांशी सलोख्याने वागा. प्रेमविवाहाचे योग संभवतील.
** ॐ नमः शिवाय जप करा.

कर्क :
कौटुंबिक जीवनात आनंद प्राप्ती होऊन छोटे प्रवास घडतील. आत्मविश्वास आणि उत्तम निर्णयक्षमता, यामुळे धनलाभ योग होईल. नोकरीमध्ये प्रमोशन तसेच विवाह योग घडतील. क्रोधावर नियंत्रण आणि संतती बरोबर वैचारिक मतभेद टाळा.
** श्रीगणेश आणि शिवउपासना

सिंह :
बुद्धीच्या जोरावर यश आणि अचानक शुभ समाचार मिळतील. कोर्ट-कचेरी आणि महत्वाच्या कामात यश लाभेल. ज्येष्ठ व्यक्तींकडून सहकार्य आणि मार्गदर्शन लाभेल. कामाच्या ठिकाणी वादविवाद असले तरी प्रभाव तुमचाच असेल. प्रेमसंबंध, विवाहयोग घडतील. परदेशी कामात यश मिळेल. नवीन वास्तूमध्ये निवेश टाळा. उत्तरार्धात ग्रहणयोगात शुभकर्म टाळावीत.
**श्री हनुमान उपासना.

कन्या :
कार्य-व्यापार वृद्धी तसेच कामाची रूपरेखा आखल्याप्रमाणे अंमलबजावणी करता येईल. पैशाची बचत होऊन प्रवासातून लाभ घडतील. कर्ज घेणं टाळा, तसेच जुनी मालमत्ता विकून त्याला योग्य किंमत प्राप्त होईल. प्रेमसंबंध किंवा मनपसंत साथीदाराची ओळख होईल. वाहन योग नवीन वास्तूखरेदी दर्शवते.
**श्रीगणेशाला काजूचा नैवेद्य आणि खीरतुळा :*

तूळ : अचानक अस्थिरता आणि कार्यासबंधी कठीण काळ दर्शवतो. वाहन प्रवास सांभाळून करा. लक्ष्मीयोग दर्शवतो. आपल्या जोडीदाराची आणि आपल्या तब्बेतीची विशेष काळजी घ्या. नवीन वास्तूमध्ये निवेश करण्यास योग्य काळ. सन्तानप्राप्तीसाठी चिंता असल्यामुळे कृत्रिमरीत्या उपाय खर्चिक ठरू शकतात. पराक्रम योग असला तरी प्रेम प्रकरणापासून दूर रहा. सरकारकडून लाभ. नवीन नोकरी योग लाभदायक.
** श्रीलक्ष्मीसुक्त पठण

वृश्चिक :
कामाच्या ठिकाणी पुन्हा एकदा आपला दबदबा निर्माण होऊन पुनर्प्रस्थापित व्हाल. वैवाहिक जीवनात मतभेद आणि वादविवाद टाळा. वाहन खरेदीसाठी योग्य, पण नवीन वास्तू खरेदीसाठी योग्य काळ नाही. प्रवासयोग घडून भाग्योदय होईल. मनाची चंचलता आणि उद्विग्नता वाढेल. पुरुषार्थ आणि पराक्रम वृद्धी होऊन परोपकार घडतील. प्रेमप्रकरणात वाद संभवत आहेत.
**शिवलिंगावर जल आणि दुधाचा अभिषेक.

धनु :
ज्येष्ठांचे सहकार्य, वडिलांकडून मदत मिळेल. आत्मविश्वासाची कमतरता भासेल. वादविवादापासून दूर रहा, शत्रू वरचढ ठरू शकतात. नकारात्मक विचारांचे पोषण टाळा. कुठल्याही वैयक्तिक किंवा व्यावसायिक प्रकरणात दुसऱ्याची मध्यस्थी टाळा. आर्थिक विवंचना भासेल. दुसऱ्यांना मदत करताना स्वतःच नुकसान होणार नाही याची तसदी घ्या. जागेसंबधी प्रश्न सुटतील, पण विवाह योग टाळा.
** हनुमान चालीसा आणि तिन्हीसांजेला रामरक्षास्तोत्र

मकर :
नोकरीसंदर्भात खूप दिवस रखडलेले निर्णय आशादायक ठरतील. वाणी संतुलित परन्तु अचानक क्रोध घात करतील. दुहेरी व्यक्तिमत्व मिश्रलित ठरतील. कष्ट आणि भाग्य यांचा योग्य ताळमेळ साधता येईल. कार्य व्यापारासाठी प्रवासयोग घडतील. मानसन्मान वृद्धी, आध्यात्मिक विचारधारा अशी सात्विक मनःसिद्धी घडेल. वास्तू निवेश टाळा. जोडीदार अथवा प्रेमप्रकरणातून मनःशांती मिळेल. विवाहयोग घडतील.
** श्रीविष्णुसहत्रनामस्तोत्र पठण

कुंभ :
शत्रू त्रास देतील. शारिरीक कष्ट तसेच शारिरीक विकार त्रासदायक ठरतील. घशाचा जन्तुसंसर्ग तसेच श्वासाचे विकार डोकं वर काढतील. कर्जसंबधी काम होतील. मनाची उद्विग्नता, लहान मुलांशी वैचारिक मतभेद अडचणीचे ठरतील. वास्तू विकताना फसवणूक होऊ शकते. परिश्रम करूनही यश विलम्बित. यात्रा लाभदायक ठरतील.
सूर्य अर्घ्य आणि हनुमान चालीसा पठण

मीन:
जवळच्या व्यक्तिपासून हानी अथवा दुःख संभवेल. शिक्षणाचे योग होतील. लक्ष्मी प्राप्ती होईल. कर्जसमाप्ती होईल. कष्टाला भाग्याची साथ लाभेल. नवीन नोकरी, नोकरी बदल, नवीन दुकान अथवा ऑफिस खरेदी घडेल. विवाह नक्की होतील. मानसन्मन मिळतील. शेयर मार्केटमध्ये लाभ. वाहन योग घडतील.
** श्रीविष्णुसहत्र नाम पठण

 

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. प्रशांतकुमार पाटील यांची नियुक्ती

‘लैंगिक छळाची प्रकरणं दडपता येणार नाहीत’