in

Weather Forecast| राज्यात लवकरच होणार मान्सूनचे आगमन

अंदमान निकोबार बेटांवर नैऋत्य मोसमी वाऱ्याचं आगमन झालं आहे. येत्या तीन दिवसांत केरळातही मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात मान्सूनदाखल व्हायला अद्याप १५ दिवसांचा कालावधी बाकी आहे. तत्पूर्वी पुढील पाच दिवसांत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

30 मे 2021 पासून ईशान्येकडील राज्यांसह दक्षिण-पूर्वेकडील सर्व राज्यांत जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. दक्षिणेकडून येणाऱ्या तीव्र वाऱ्यामुळे महाराष्ट्रासह, पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार, झारखंड, कर्नाटक, गोवा, तामिळनाडू, केरळ या राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पुणेकरांना दिलासा, जाणून घ्या नवीन नियमावली

Twitter ला ठोठावण्यात आला ‘इतक्या’ डॉलर्सचा दंड