in

Weather Alert | पुण्यासह राज्यातील 6 जिल्ह्यात Red Alert

Share

येत्या 24 तासांत राज्याला रेड अलर्ट देण्यात आला असून कोकणासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

आज दिवसभरात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. दक्षिण कोकण, गोवा भागात मुसळधार पावसाचा अंदाज तर मुंबईसह ठाणे काही भागात पावसाचा अंदाज आहे हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.

आज मुंबई, ठाणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, पुणे जिल्ह्यात काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळा वर्तविला आहे. मुंबई-ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरांमध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस पडणार आहे. गोवा आणि तळकोकणाला मुसळधार पावसाचा इशारा गोवा वेधशाळेकडून देण्यात आला आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापुरात पुढचे तीन दिवस अति मुसळधार पाऊस असेल त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असं आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. तर तळकोकणात समुद्र किनाऱ्याजवळील परिसरातील नागरिकांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शन: दीपिकाला NCB आज समन्स बजावण्याची शक्यता

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची जामीनावर सुटका