in

आम्ही देशातंर्गत तेल प्रकल्प तरी उभारले, तुम्ही सात वर्षांत काय केले ते सांगा…

पेट्रोल-डिझेलच्या दरांचा भडका उडाला असून, सर्वसामान्यांच्या खिशाला आर्थिक झळ बसू लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनाच्या वाढत्या दरांसाठी आधीच्या सरकारांना जबाबदार ठरवलं होतं. मोदींच्या या टीकेवरून माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदींवर पलटवार केला. “मागील सरकारने कमीतकमी देशातंर्गत तेल प्रकल्प तरी उभारले. तुम्ही सात वर्षांत काय केले ते सांगा,” असा सवाल चव्हाण यांनी केला आहे.

इंधन दरवाढीबाबत प्रश्‍नावर विचारले असता चव्हाण म्हणाले, “देशाच्या मागणीच्या तुलनेत ८५ टक्के तेल आयात करावे लागत आहे. या तेलाची किंमत आंतरराष्ट्रीय पातळीवर निश्‍चित होते. चुकीच्या कररचनेमुळे आणि केंद्र सरकारच्या आडमुठेपणामुळे देशवासीयांना पेट्रोल, डिझेल महाग मिळत आहे. आधीच्या सरकारांनी देशातील साठ्यांचा शोध घेत तेल प्रकल्प उभारले आहेत. तुम्ही सात वर्षांत कोणते प्रकल्प उभारले ते जाहीरपणे सांगा. करोना काळातील मदतीचे फुगीर आकडे सांगत सर्वसामान्यांना लुटायचे काम सुरू आहे,” अशा शब्दात चव्हाण यांनी मोदींवर निशाणा साधला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पेट्रोल डिझेलचे वाढते दर अन् सोशल मीडियावर नेटिझन्स सक्रिय…

वाळू उपसा प्रकरणी दंड न भरल्याने महसूलकडून जमीन जप्त