in

माझ्या नातवाच्या बोलण्याला काडीचीही किंमत नाही – शरद पवार

We don't pay attention to what my grandson says - Sharad Pawar
We don't pay attention to what my grandson says - Sharad Pawar
Share

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईतल्या वायबी चव्हाण येथे भेट घेतली, त्यावेळी पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी हे विधान केलं. सध्या सुशांत सिह राजपूत याच्या आत्महत्येला ज्या पध्दतीने महत्व दिलं जात आहे, त्याचं आश्चर्य वाटतं. असंही मत शरद पवार यांनी यावेळी बोलताना मांडलं आहे.

पार्थ पवारांनी सुशांत सिंह प्रकरणामध्ये सीबीआय चौकशीची मागणी केली, त्यामुळे राज्यातल्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे, त्याचसंदर्भात शरद पवारांना प्रश्न विचारला असता, माझ्या नातूच्या बोलण्याला आम्ही कवडीची किंमत देत नाही, तो अजून या सगळ्या प्रकरणात अपरिपक्व आहे. परंतू या बाबतीत जर कोण सीबीआय चौकशी करण्याची मागणी करत असेल, तर त्यांनी खूशाल करावी. पण माझा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर शंभर टक्के भरवसा आहे. असंही मत शरद पवार यांनी मांडलं आहे.

मी आणि संजय राऊत हे दोघे राज्यसभेचे मेंबर आहोत, त्यामुळे आम्ही सतत भेटत असतो, या सगळ्यात सुशांत सिंहचा विषय आमच्यात नव्हता. त्या विषयाची ज्याप्रकारे चर्चा सुरू आहे, त्याचं मला आश्चर्य वाटतं, असंही मत शरद पवारांनी व्यक्त केलं आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

…तर केंद्रातल सरकार पडणार-संजय राऊत

Breaking: Tukaram Mundhe replaced

मनपा आयुक्त कार्यालयासमोर जय जवान जय किसान संघटनेचे आंदोलन