in ,

“आम्ही शरजील सोबत आहोत” – एल्गार परिषदे आयोजक

लोकशाही न्यूज नेटवर्क

एल्गार परिषदेच्या कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य करण्यात आले आहे. पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत शर्जिल उस्मानी याने हिंदू समाज सडलाय असं वाग्रस्त वक्तव्य केलं होतं. 30 जानेवारी रोजी झालेल्या एल्गार परिषदेमध्ये विद्यार्थी नेता शरजील उस्मानी याने वादग्रस्त भाषण केल्याप्रकरणी भाजप युवा मोर्चाचे पुणे प्रदेश सचिव प्रदीप गावडे यांनी शरजील उस्मानी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी स्वारगेट पोलिसांकडे केली होती.

त्यानंतर आता शरजील उस्मानी विरोधात स्वारगेटमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी नेता शरजील उस्मानी याला आपला पाठिंबा असल्याचे ‘एल्गार परिषद २०२१’ च्या आयोजकांनी एका निवेदनाद्वारे जाहीर केलं आहे. एल्गार परिषदेचे एक आयोजक माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी यापूर्वीच शरजीलच्या वक्तव्याबाबत माफी मागितली होती. “शरजील चांगलं बोलला पण त्याने ‘मनुवादी’ ऐवजी ‘हिंदू’ शब्द वापरला ही त्याची चूक झाली,” असं कोळसे पाटील यांनी म्हटलं होतं.


आता “आम्ही शरजील सोबत आहोत” एल्गार परिषदेच्या आयोजकांनी सांगितले आहे. ‘भीमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियान’ या आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर न्या. कोळसे पाटील यांनी इंग्रजी आणि हिंदीमध्ये शनिवारी संध्याकाळी एक निवेदन दिलं. त्यांनी म्हटले आहे की, “३० जानेवारी रोजी झालेल्या एल्गार परिषदेत शरजील उस्मानी यानं दिलेलं भाषण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा आणि त्यांच्या संघ परिवाराकडून चुकीच्या पद्धतीनं दाखवलं जात आहे. शरजीलला लक्ष्य करुन संघ परिवाराने पुन्हा एकदा आपला धार्मिक विद्वेषाचा आणि जातीयवादी चेहरा दाखवून दिला आहे”

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मंगळवार आणि बुधवारी माटुंग्यात पाणीपुरवठा बंद

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर