in

मंगळवार आणि बुधवारी माटुंग्यात पाणीपुरवठा बंद

लोकशाही न्यूज नेटवर्क

मंगळवार आणि बुधवारी माटुंग्यात पाणीपुरवठा बंद राहणार आहे . या काळात परळ परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. रावळी उच्चस्तरीय जलाशय येथे ९०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून गळती होत असून तिच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्याचा निर्णय मुंबई महापालिकेच्या जल विभागाने घेतला आहे.

एफ-दक्षिण विभागातील दादर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग व जगन्नाथ भातनकर मार्ग, बी. जे. देवरुखकर मार्ग, गोविंद केणी मार्ग, हिंदमाता, लालबाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, चिवडा गल्ली, डॉ. एस. एस. राव मार्ग, दत्ताराम लाड मार्ग, जिजीभॉय गल्ली, महादेव पालव मार्ग, साने गुरुजी मार्ग, गॅस कॉलनी परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

एफ-उत्तर’ विभाग कार्यालयाच्या हद्दीतील शिवशंकर रोड, भारतीय कमला नगर, बीपीटी इमारत, किस्मत नगर, बंगालीपुरा, राजीव गांधी नगर परिसरातील; तर १० फेब्रुवारी रोजी सी. जी. एस. वसाहत, अ‍ॅन्टॉप हिलमधील वर्धराज नगर, कामराज नगर, जय महाराष्ट्र नगर, गरीब नवाज नगर, बाबासाहेब आंबेडकर नगर, मोतिलाल नेहरू नगर, विजय नगर, भारतीय कमला नगर, चांदणी आगार, चिखलवाडी, संगम नगर, हिंदुस्थान नगर, शांती नगर, दीनबंधू नगर, गणेश नगर, शिवशंकर नगर, आनंदवाडी, आनंद नगर, करीम वाडी, नानाभाई वाडी, लक्ष्मण वाडी, मानूरवाडी, काले वाडी, लाल बहादूर शास्त्री नगर, गिरीधर तांबे नगर, रमामाता वाडी, महात्मा फुले वाडी, या भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

देशात कोरोना रुग्णांची संख्या घटली

“आम्ही शरजील सोबत आहोत” – एल्गार परिषदे आयोजक