in

डोंबिवलीतील भोपर देसलेपाडय़ात पाणी टंचाई

सुरेश काटे | कल्याण-डोंबिवली मधील 27 गावांच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पाण्यासाठी एका तरुणीचा हात मोडला असून डोंबिवली पूर्व भागातील भोपर देसलेपाडय़ातील परिसरातील नागरीकांना पाणी टंचाई भेडसावत आहे. या पाणी टंचाईला कंटाळून या नागरीकांनी उपोषण करण्याचा इशारा महापालिका प्रशासनास दिला आहे.

गेल्या चार महिन्यापासून या इमारतीमधील नागरीकांना पुरेशा दाबाने पाणी पुरवठा केला जात नाही. त्यामुळे चार महिन्यापासून नागरीक त्रस्त आहेत. पाणी पुरशा दाबाने येत नसल्याने इमारतीमधील नागरीकांना दररोज पाण्याचा टँकर मागवावा लागतो. लहान आकाराच्या टँकरला 500 रुपये तर मोठय़ा आकाराच्या टँकरला दीड ते दोन हजार रुपये मोजावे लागत आहे. कोरोना काळात नागरीक मेटाकूटीला आलेले आहेत. त्यात पाण्यावर दररोज होणारा खर्च हा त्यांच्या खिशाला परवडणारा नाही. मनपा अधिकारी कमीदाबाने पाणी येत असल्याची तपासणी देखील केली आहे मात्र पाणी प्रेशरने देण्याऐवजी नवीन पाईपलाईन घेण्याचा सल्ला अधिकारी देत आहेत

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पन्नाशीतल्या सतेज पाटील, विश्वजित कदमांना काँग्रेस राज्यमंत्री पदीचं कसं काय ठेवतंय ? अजित पवारांची खंत

ED summons | शेतकऱ्यांचा गळा आवळणाऱ्यांना शिक्षा होणारच – आ. प्रताप अडसड