क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सध्या क्रिकेट खेळत नसला तरी तो विविध कारणामुळे चर्चेत असतो. मग एखादं टविट म्हणा अथवा एखादी चाहत्याची भेट. सध्या एका मुंबईच्या रिक्षावाल्यामुळे सचिन तेंडुलकर चर्चेत आला आहे. या संदर्भात व्हिडीओहि सचिनने शेअर केला आहे.
नेमक या व्हिडीओत आहे तरी काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच, तर झाल असं, सचिन कांदिवलीहून बांद्र्याला त्याच्या घरी परतत असताना रस्ता चुकला. मुंबईत सध्या मेट्रोचे विविध ठिकाणी कामं सुरू असल्याचे काही मार्ग वन-वे करण्यात आले होते. त्यामुळे गाडीतील नकाशाचीही मदत त्याला घेता येत नव्हती.
दरम्यान सचिनने एका मुंबईकर रिक्षा चालकाची मदत घेतली. मंगेश फडतरे या रिक्षा चालकाने सचिनला आपल्या रिक्षाला फॉलो करण्यास सांगितलं. यावेळी सचिनने त्या रिक्षा चालकाची आपुलकीने चौकशी केली. त्यांनतर सचिनची कार मूळ रस्त्याला आल्यानंतकर सचिनने रिक्षा चालकाला एक सेल्फीही काढू दिला. सचिनने आपल्या फेसबुकवर या संदर्भातला व्हिडीओ शेअर केला आहे. दरम्यान सदरचा हा व्हिडीओ जानेवारी २०२०चा असल्याचं नमूद केलं आहे.
Comments
0 comments