in

Watch video; 8 फुटी अजगर जेव्हा महामार्गावर येतो…आणि एकच

Share

मुंबईतील पूर्व द्रुतगती महामार्गावर मंगळवारी एका वेगळ्याच कारणामूळे ट्राफिक लागली होती.हे कारण होते एक महाकाय अजगर… चक्क हा अजगरच महामार्गावर आला होता.त्यामुळे वाहन धारकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. या संदर्भातला व्हिडीओही समोर आला होता.

सोमय्या मैदानातून आठ फूट लांबीचा अजगर पूर्व द्रुतगती महामार्गावर आला आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या एका कारच्या चाकात जाऊन बसला. त्यामुळे कार चालकाने गाडी जाग्यावर उभी केली. परिणामी महामार्गावर वाहतूक कोंडी झाली.

दरम्यान, स्थानिक नगरसेवक कप्तान मलिक यांनी या घटनेची माहिती महाराष्ट्र अॅनिमल रेस्क्यू असोसिएशनच्या सर्पमित्रांना दिली. त्यानंतर सर्पमित्र अभिरुप कदम, सिद्धार्थ गायकवाड आणि सुनील कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अजगराला कारखालून सुरक्षित बाहेर काढलं. 

कारमध्ये अडकलेल्या अजगराला पाहण्यासाठी रस्त्यावरील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सध्या या घटनेचे व्हिडिओज आणि फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र या अजगरामुळे सुमारे अर्धा ते पाऊण तास वाहतूक कोंडी झाली होती.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

मुंबईसह उपनगरात रात्रभर पावसाची धुवाधार बॅटींग;सखल भाग झाला जलमय

Video;धोनीने मारलेला सिक्सरचा बॉल तो घरी घेऊन गेला…