in

Maratha Reservation; ”ताकद योग्य वेळी दाखवूच”; संभाजीराजेंचा सूचक इशारा!

मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे.सत्ताधारी व विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध रंगत आहे. त्यात आता भाजप नेत्यांमध्येच आरक्षणाच्या मुद्दयावर जुंपल्याचे चित्र आहे. भाजपा नेते नारायण राणे यांनी संभाजीराजेंवर केलेल्या टिप्पणीवर आता संभाजीराजेंनी ट्विटद्वारे इशारा दिला आहे.

“छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही तर न्याय देणे आहे आणि ताकदच पहायची असेल, तर योग्य वेळी ती दाखवू. ताकद दाखविण्यासाठी लोकांचे जीव घेणे योग्य नाही त्यापेक्षा लोकांचे जीव कसे सुरक्षित ठेवता येतील हे महत्त्वाचे आहे, कारण माझा वारसा शिवशाहूंच्या विचारांचा आहे.” असं संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

नारायण राणे काय टिप्पणी केली होती?

“छत्रपती संभाजीराजे यांच्यात धमक दिसत नाही. खासदारकीची मुदत संपत आली की आंदोलनाची, राजीनामा देईन, पक्ष काढेन अशी भाषा सुरु आहे. छत्रपती संभाजीराजे कोकणात आले? कधी कुठे आले, मला भेटले नाही. मला समजलं असतं तर मी स्वागत केलं असतं, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन आरक्षण मिळत नाही आणि असं पुढारी होत नसतात. राजे हे समाजानं म्हणावं लागतं. आता टर्म संपत आल्यावर राजेंनी राजीनामा देऊ नये. राजे फिरताहेत पण रयत दिसत नाही आजूबाजूला. राजांना रयत भेटायला येते हे का फिरतायत”, अशी टीका नारायण राणे यांनी केली पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना केली होती.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Petrol diesel rate | पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ

तराफा दुर्घटना | ONGC चे 3 कार्यकारी संचालक निलंबित