वर्धा जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णाची पाहता 144 कलम लागू करण्यात आली असुन जमावबंदी करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील शाळा, कॉलेज 22 फेब्रुवारीपासून बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे रुग्णसंख्या नियंत्रणासाठी आणि कोरोना विषाणूचा संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात 144 कलम लागू करण्यात आले आहे. तसेच हॉटेल्स, खाद्यगृह, रेस्टॉरंट तसेच लग्न समारंभात मास्क बंधनकारक व कोरोना नियमांचे पालन करण्याचे पुन्हा आदेश पारित करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांमध्ये कोरोना रुग्णांचा संसर्ग होण्याची भीती लक्षात घेता शाळा, कॉलेज बंद ठेवण्याचे निर्देश काढण्यात आले आहेत. 22 फ्रेब्रुवारीपासून पुढील आदेशपर्यत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिले आहे.
Comments
Loading…